महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २ मार्च) : कसबा विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाने पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कसबा निवडणुकीत झालेला हा भाजपच्या पराभवापेक्षा काँग्रेसचा विजय अधिक आहे. भारत जोडो यात्रेनंतर संघटनेत वाढलेल्या आत्मविश्वासाचा फायदा या निवडणुकीत झाल्याचे दिसून येते. असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केले.
भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी ‘डरो मत ‘ चा दिलेला नारा काँग्रेसच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे. भाजपाला आपणच आव्हान देऊ शकतो हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्यात निर्माण झाला आहे. भाजपच्या धोरणामुळे शेतकरी, तरुणवर्ग, मध्यमवर्ग सर्वच जण नाराज असून उघड भूमिका घेण्यापॆक्षा मतदानातून नाराजी दाखविण्याचा मतदारांचा कल आहे. आगामी पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील हा निकाल महत्वाचा आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरातील छोटे उद्योजक, कामगार आणि तरुण हे सर्वच भाजपच्या धोरणावर नाराज असून या निवडणुकीत मिळालेली सहानभूती भविष्यात मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे भारत जोडो यात्रेतून मिळालेली सकारात्मकता आणि भाजपविषयी असणारी नकारात्मकता हा दुहेरीनीती राबवण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालेल्या या आत्मविश्वासाला योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्याची गरज असून कसब्याची पुनरावृत्ती संपूर्ण पुणे जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास चंद्रशेखर जाधव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.16 सप्टेंबर :- वेंगुर्ला आणि एकूण कोकण तसं पहायला गेले तर सुंदरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…
जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…