Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

जुनी सांगावीत रस्त्यावरच भरतेय भाजी मंडई … उद्घघाटन झालेली मंडई बेवारस अवस्थेत धूळखात पडून!

महाराष्ट्र 14 न्यूज : अस्ताव्यस्थ भाजी विक्रेत्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. त्यामुळे शहरातील रस्ते अडविणारे बाजार अधिकृत ठिकाणी स्थलांतर करावेत, अशी नागरिकांची मागणी होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सांगवी गाव येथे सुसज्ज अशी भाजी मंडई करून विक्रेत्यांची अडचण सोडविली, अन रस्ते बाजारमुक्‍त होऊन नागरिकांना होणारा त्रास थांबेल आणि परिसराचा बकालपणा कमी होईल अशी जुनी सांगवीतील नागरिकांची मागणी महापौर माई ढोरे यांनी पूर्ण करून सांगवीकरांना सोईस्कर असणारी जुनी भाजी मंडई दिमाखात उदघाटन करून चालू केली.

Google Ad

सोलंकी ज्वेलर्स … ‘नाते शुद्धतेशी‘ सोने • चांदी . डायमंड • प्लॅटीनम • राशी रत्ने .. दिघी रोड, जुनी सांगवी , मेन रोड 👇🏻👇🏻

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने गजानन महाराज मंदिरा समोर सांगवी येथे काही वर्षा पूर्वी भाजी मंडई सुरू केली होती, यात एकूण ७६ गाळे आहेत, या ठिकाणी भाजी मंडई सुरू होती, परंतु अनेक विक्रेते हे सांगवी च्या मुख्य रस्त्यावर भाजी विकु लागल्याने मंडईतील ग्राहक कमी झाले, आणि मंडईतील विक्रेत्यांनी आपले दुकान रस्त्यावर मांडले, विक्रेत्यांसह फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाने नागरिकांना चालणे कठीण झाल्याने तक्रारी वाढल्या आणि सांगावीतील जुनी भाजी मंडई पुन्हा नव्याने सुरु करण्याची औपचारिकता महापौर माई ढोरे यांनी उदघाटन करून पूर्ण केली.

परंतु झाले वेगळेच “लागले वळण, इंद्रिया सकळ” प्रमाणे भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांना बोलणार कोण? आज स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी चिंचवड मधील सांगवीच्या ‘ना’ नागरिकांत ( रस्त्यावर भाजी घेणारे ग्राहक ) बदल झाला ‘ना’ भाजी विक्रेत्यांच्यात बदल झाला आणि उद्घघाटन झालेले ७६ गाळे असणारी सुसज्ज अशी भाजी मंडई ग्राहक आणि विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत अक्षरशः धूळ खात पडून आहे, तेथे ना ग्राहक ना विक्रेते आता या गोष्टीकडे मनपा प्रशासन कशाप्रकारे कारवाई करते या प्रतीक्षेत सुजाण सांगवीकर वाट पाहून आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

95 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!