Categories: Editor Choice

पीएमपीएमएलचा अनोखा उपक्रम …फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतुकीबाबत जनजागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २८  एप्रिल २०२२) :आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वापरामुळे इंधन दरवाढ, वाहतूककोंडी आणि प्रदुषणावर चांगला उपाय ठरेल.  फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतुकीबाबत जनजागृती व्हावी यासाठी पीएमपीएमएलचा अनोखा उपक्रम.

          पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात  आलेल्या फिरत्या प्रदर्शनाचे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्वागत केले आणि प्रदर्शन पाहिले. यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, विलास साळवी तसेच पीएमपीएमएल चे कर्मचारी विकास सुतार, महेश बिराजदार, ओंकार चितळे आदी उपस्थित होते.

          दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे तसेच खाजगी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे अपुरी पार्किग व्यवस्था,वाहतूककोंडीआणि प्रदूषणात वाढ होत आहे. परिणामी नकळतपणे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपले शहर स्वच्छ ,सुंदर आणि पर्यावरणपूरक व्हावे यात नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. याच अनुषंगाने पीएमपीएमएलने फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आज या फिरत्या प्रदर्शनाचा शुभारंभ केला आहे.

या प्रदर्शनात पीएमपीएमएलचा  आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला असून बस चे अनेक मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत. तसेच बसमधील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सर्व सोयीसुविधा बसमध्ये करण्यात आली असून त्याबद्दलची माहिती याठिकाणी नागरिकांना भेटेल.  इंधनाला पर्याय म्हणून ई- बस सुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अल्प दरात बसचा प्रवास करता यावा यासाठी विविध पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात शालेय विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक, मनपा हद्दीतील प्रवास, दैनंदिन पास अशा निकषानुसार पासची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे फिरते प्रदर्शन जास्तीत जास्त नागरिकांनी पाहावे आणि पीएमपीएमएल आणि सार्वजनिक वाहतुकीचे फायदे याबद्दल माहिती घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून आपले शहर पर्यावरणपूरक बनविण्यात आपले अनमोल योगदान द्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

                             

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

3 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago