महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जुलै) : बंगळुरू येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधाकांची आघाडी तयार करण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले असून या आघाडीचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.
नावाची अधिकृत घोषणा लवकरच होणार :
बंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने दोन दिवसीय बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. याच बैठकीत विरोधकांच्या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात – Indian, N National, D – Democractic, I- Inclusive, A- Alliance असं हे नाव आहे. याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
इंडियामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, सीपीएम सारखे तब्बल 26 राजकीय पक्ष सामील झाले आहे.
विरोधी पक्षाच्या या बैठकीदरम्यान सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी तब्बल दोन वर्षांनी एकमेकांना भेटल्या आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात देखील चर्चा झाली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत काँग्रेसने पंतप्रधान पदावरची दावेदारी सोडली आहे. ही आघाडी सत्तेसाठी किंवा पंतप्रधान पदासाठी नसल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…