Google Ad
Uncategorized

देहूतील देऊळवाड्यात’मॉकड्रिल’चा थरार ! …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ ऑगस्ट) : देहूरोड पोलिस ठाणे आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्यावतीने देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात आज शुक्रवारी (दि.११) सायंकाळी सहा ते सात या वेळेत मॉकड्रिल घेण्यात आले. देऊळवाडा येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तीन अतिरेक्यांनी वेठीस धरल्यानंतर पोलिस यंत्रणा कशा प्रकारे कारवाई करते, याचे प्रात्यक्षिक यावेळी करण्यात आले. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मॉकड्रिल करण्यात आले.

पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे म्हणाले, ”मंदिर हे संवेदनशील आहे. दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली होती. अशा वेळी अतिरेकी मंदिरात शिरले तर अशा प्रसंगाला तोंड कसे द्यायचे, यासाठी मॉकड्रिल केले.” एक उपायुक्त, एक सहायक पोलिस आयुक्त, तीन पोलिस निरीक्षक, दहा अधिकारी, १५० पोलिस कर्मचारी, दोन रॅपिड पथक, बॉम्ब शोधक पथक, दोन रुग्णवाहिका, दोन अग्निशामक बंब यात सहभागी झाले होते. यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानच्या सहकार्याने एक तास दर्शन बंद ठेवण्यात आले होते. तसेच संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती.

Google Ad

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!