Google Ad
Editor Choice india

Delhi : सुप्रीम कोर्ट ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सुनावणी पुढील आठवड्यात घेईल … तोपर्यंत रुग्णांनी श्वास रोखून धरावा – काँग्रेसचं टीकास्त्र

महाराष्ट्र 14 न्यूज : देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे. गुरुवारी मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी ही परिस्थिती भयानक असल्याचे सांगितले. केंद्र सरकारकडून त्यांनी 4 विषयांवर राष्ट्रीय आराखडा मागवला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज पार पडणार होती. देशात आणीबाणीसदृश्य परिस्थती निर्माण झाल्याचं काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.

CJI एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी सांगितले की, ‘कोरोना आणि ऑक्सिजन मुद्द्यावरून दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्य प्रदेश, कलकत्ता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील 6 वेगवेगळ्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे आम्हाला दिसून येत आहे.

Google Ad

याक्षणी ऑक्सिजन यामुळे गोंधळ होऊ शकतो. ‘ खंडपीठाने केंद्र सरकारच्या वतीने उपस्थित असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या विषयावर राष्ट्रीय नियोजन मागितले होते. मात्र आज धक्कादायकरीत्या सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढील आठवड्यात ढकलल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

यावरून काँग्रेसच्या नेत्याने ट्विट करत अप्रत्यक्षरीत्या सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. काँग्रेस नेते सलमान नाझमी यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटलंय की, “सुप्रीम कोर्ट ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सुनावणी पुढील आठवड्यात घेईल तोपर्यंत रुग्णांनी श्वास रोखून धरावा किंवा मरा असं उपहासात्मकपणे म्हटलंय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

51 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!