Categories: ArticlesEditor Choice

पिंपरी चिंचवडकरांचा थरकाप उडवणारी, श्वास रोखून … आणलेल्या श्वासांची गोष्ट! … सविस्तर वाचा, न्यूज रिपोर्टर गोविंद वाकडे यांच्या नजरेतून …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २१ एप्रिल २०२१) : श्वास रोखून …आणलेल्या श्वासांची गोष्ट, पिंपरी चिंचवड चे न्यूज रिपोर्टर गोविंद वाकडे यांनी घेतलेला लेखाजोखा त्यांच्या नजरेतून …

▶️वेळ दुपारी-2 :00

ऑक्सिजन बेडवरील रुग्ण स्थलांतरित करण्यासाठी डॉक्टरांचे रुग्णांच्या नातेवाईक, महापालिका प्रशासन आणि पोलिसांनाही फोन.

▶️वेळ संध्याकाळी 6:00

अनेक रुग्णालयातील रुग्ण स्थलांतरित करण्यासाठी पालिका प्रशासनाची तयारी

▶️वेळ संध्याकाळी 8:00

परिस्थिती हाताबाहेर जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप अनावर होईल या भीतीने अनेक डॉक्टरांची लोकप्रतिनिधीकडे धाव/बैठक

पिंपरी चिंचवड मधील ह्या परिस्थितीची चर्चा वाऱ्या सारखी पसरली,
गांभिर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा आणि संबधित यंत्रणाला विचारणा झाली आणि त्याच दरम्यान न्यूज चॅनल वर गांभीर्य विषद करणारी बातमी झळकली आणि एव्हढा वेळ सोयीनुसार काम करण्यात मश्गुल असलेलं प्रशासन खाडकन जागं झालं.

तातडीने बैठक घेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, FDA अधिकारी, महापालिका अधिकारी यांनी सूत्रे हातात घेतली, पिंपरी चिंचवड मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि उपायुक्त स्मिता झगडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली,
त्या बरोबर श्रीमती झगडे यांनी विद्युत वेगाने चाकण गाठलं आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त घेत 11 वाजताच्या सुमारास जिल्ह्या बाहेर जाणारे ऑक्सिजनचे टँकर रोखून धरत ते पिंपरी कडे वळवले..

हे सुरू असतांनाच शहरातील इतर खासगी डॉक्टर आणि पिंपरीचे माजी उपमहापौर सचिन चिंचवडे चाकण मधील ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटवर धडकले तेव्हा त्यांच्यात आणि खेडचे प्रांताधिकारी आणि इतर अधिकारी जे पहाटेपासून प्रत्येक प्लांटवर ठिय्या मांडून बसले होते त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, वाद विकोपाला जाणार त्या आधी चिंचवडे यांनी अर्धे सिलेंडर आम्हाला द्या अर्धे तुम्ही न्या असा तोडगा काढला आणि पदाधिकारी अधिकारी वाद मिटला, मात्र चिंचवडेना काही सिलेंडर औद्योगिक कंपन्यांनाही दिले जातायत असं दिसलं जे धक्कादायक होतं कारण जीव वाचवणं महत्वाचं असतांना कुणाचे उद्योगधंदे प्रशासन चालवतय हा प्रश्न निर्माण झाला

 

पण ही परिस्थिती अचानक निर्माण झाली? की कृत्रिम टंचाई निर्माण केल्या गेली? की नियोजन चुकलं ?की याही प्रकरणात राजकीय हस्तक्षेप केल्या गेला..?
तर दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर आहे राजकीय हस्तक्षेप..
लिंडे e नावाची गॅस उत्पादक कंपनी सोबत गॅब i या पुरवठादाराने एक करार केला ज्या नुसार पिंपरी महापालिकेच्या YCM रुग्णालयासाठी लिंडे ऑक्सिजन पुरवणार होतं.

गॅब वाल्या काकांनी जास्तीच डोकं चालवलं आणि जम्बो कोविड सेन्टरलाही पुरवठा सुरू ठेवला, ह्या उचापती बाबत लिंडेला कळालं आणि त्यांनी करारनामा सोडून इतर कुठल्याही सेन्टरला पुरवठा करण्यास नकार दिला अर्थात ह्या नकारा मागे असलेलं कारण म्हणजे ऑक्सिजनचा दर वाढविणे हे होतचं पण त्याच बरोबर लिंडे उत्पादित करत असलेला ऑक्सिजन पिंपरी चिंचवड मध्ये देऊ नये असा राजकीय दबावही होता त्यामुळे लिंडे नि ऑक्सिजन देणं बंद केल्यावर ऐनवेळी पुरवठादार ऑक्सिजन देऊ शकला नाही आणि यंत्रणा व्हेंटिलिटरवर गेली.

असो …

काही प्रामाणिक अधिका-यांमुळे कालची हाताबाहेर जाणारी परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली हेच खरं
त्यामुळे ज्यांनी ज्यांनी स्वतःचा श्वास रोखून अहोरात्र मेहनत केली त्या सर्वांना मानाचा मुजरा….

आणि ज्यांना ही परिस्थिती उदभवणार हे (3 दिवसांपूर्वीच )माहीत होतं तरीही ते केवळ अधिकारीपण भूषविण्यात मग्न होते त्या सर्वांना कोपरापासून नमस्कार …करून
सांगयाचं एव्हढचं आहे की परिस्थिती वाईट आहे चुकलं तर चुकलं म्हणा लोकं तुम्हाला माफ करतील पण तुमच्या दुर्लक्षामुळे निष्पाप बळी जात असतील तर काळ तुम्हाला प्रश्न विचारणार आहे हे लक्षात ठेवा

▶️आवर्जून:

काल जागल्याची भूमिका घेणारे मीडिया आणि ज्यांनी जीवाची बाजी लावून बंदोबस्तात प्राणवायू आणला त्या सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कर्मचा-यांना सॅल्युट….

🔴गोविंद अ. वाकडे

( सदर लेखाचे लेखक हे प्रसिद्ध पत्रकार आहेत..)

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

23 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago