Categories: Editor Choice

दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने जगताप बंधूनी उचलले पाऊल … शिबिरातील ३१४ अपंगांना दिला मदतीचा हात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २९ जुलै) : दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आमदार लक्ष्मण जगताप यांनी महत्वाचे पाऊल उचलले, शंकर पांडुरंग जगताप यांच्या संकल्पनेतून चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट , इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ” मोफत कृत्रिम हात व पाय ( जयपूर फूट ) बसविण्याचे शिबिराचे पिंपळे गुरव येथे आयोजन करण्यात आले होते. यात अपंगांना जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यात आले.

दिव्यांसाठी मोफत सहाय्यक साधने वाटप आणि तपासणी शिबीराचे उद्घाटन माजी नगरसेवक तसेच भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या हस्ते नुकतेच पार पडले, यावेळी माजी महापौर माई ढोरे, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. नांदूरकर, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शशिकांत कदम, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, उषाताई मुंढे, महेश जगताप, सागर अंगोळकर, आरतीताई चौधे, श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, दिलीप तनपुरे, माऊली जगताप,विनोद तापकीर, सखाराम रेडेकर, रमेश काशीद, शशिकांत दुधारे, अमर आदियाल, राहुल जवळकर, राजू (शशिकांत) नागणे, योगेश चिंचवडे, संदीप दरेकर, शेखर चिंचवडे, राजेंद्र शिंत्रे, संजय मराठे, गणेश बनकर, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, निर्मला कुटे, , कोमल गौंडाळकर, ज्योती कोळी युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या शिबीरात सहभागी अपंगांची तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी करून त्यांना कृत्रिम पाय किंवा बसवणे शक्य असेल त्यांच्या पायाचे मोजमाप करून त्यानुसार संबंधित अपंगांना जयपूर फूट बसवण्यात आले. शिबीरात ३१४ अपंगांच्या आयुष्यात आनंद पसरविण्याचे महान कार्य चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप या बंधूंनी केले. शिबीरात सहभागी झालेल्या १८६ अपंगांना जयफूर फूट मोफत बसवण्यात आले. त्याचप्रमाणे ८५ अपंगांना कॅलिपर्स, २८ अपंगांना व्हिलचेअर आणि १५ अपंगांना ट्रायसिकलचे मोफत वाटपयावेळी करण्यात आले. यावेळी शहराच्या विविध भागांतील दिव्यांगानी याचा लाभ घेतल्याचे दिसून आले.

कोरोनाचा दोन वर्षांचा काळ हा आपल्या सर्वांसाठी संकटाचा होता. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जवळची माणसे गमवावी लागली. अनेकांचे संसार या काळात उद्ध्वस्त झाले. आर्थिक घडी सर्वांची बिघडली. मात्र, या काळात काही लोकांनी अनेकांना आधारही देण्याचे काम केले, त्यात चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप‘ यांचा सिंहाचा वाटा होता. याकाळात त्यांनी अनेक अपंगांना मदतीचा हात दिला, तसेच महानगरपालिका व शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मदत देखील केली. तसेच दरवर्षी मोफ़त आरोग्य शिबीर, आषाढी वारीत वारकऱ्यांची आरोग्य सेवा त्यामुळे “आरोग्य सेवा म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप” असे समीकरणच तयार झाले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

7 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago