शिव महापुराण कथा सोहळ्यात सहभागी राज्यभरातील भाविकांनी नियोजनाचे केले कौतुक
– पीडब्ल्यूडी मैदान सांगवी येथील अध्यात्मिक सोहळ्याला तुफान गर्दी
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ सप्टेंबर) : पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते लक्ष्मण जगताप यांचा अध्यात्मिक व सामाजिक वारसा त्यांचे बंधू शंकर जगताप यांनी सक्षमपणे जपला आहे. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावरील विराट गर्दी म्हणजे ‘‘लक्ष्मणभाऊं’च्या माघारी शंकरभाऊंनी जपलेल्या यशस्वी जबाबदारीची पोहोच पावती आहे, अशा भावना श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या भाविकांकडून व्यक्त होत आहेत.
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन वतीने पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे करण्यात आले आहे. या कथेचा आज दुसरा दिवस होता. भाविक आणि शिवभक्तांसह सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी शिव महापुराण आणि त्याचे महात्म विशद करताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा म्हणाले की, ‘ मनात संशय असताना एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित यश मिळत नाही. म्हणून एखादी गोष्ट निशःयपणे केल्यास मिलाणारे यश हे सुखावणारे असते. याच प्रमाणे भगवान शंकरावर विश्वास ठेवून त्यांची भक्ती केल्यास निश्चित यश मिळते’. शंकर, पार्वती, कृष्ण ही सर्व परमेश्वाराचीच रुपे आहेत. यांची ध्यानधारणा केल्यानंतर त्याचे पुण्य आपल्याला लाभते. त्यामुळे निस्पृहपणे ध्यानधारणा करावी, असा मोलाचा सल्ला पं. प्रदीप मिश्रा यांनी यावेळी बोलताना दिला.*▶️दोन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी…*
महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव महापुराण कथा सोहळा असलेल्या या अध्यात्मिक पर्वातील दुसऱ्या दिवशी देखील या कथेचे श्रवण करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. सुमारे दोन लाख भाविक कथेचा आस्वाद घेताना मंत्रमुग्ध झाले. यावेळी सभामंडपाच्या बाहेर बसून अनेक भाविकांनी कथा ऐकली. वाहतूक पोलीस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्था आणि आयोजक कमिटीची दक्षता यामुळे एव्हढ्या प्रचंड प्रमाणात झालेल्या गर्दीतही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लाखो भाविक ज्ञानप्राप्ती केल्याचे समाधान घेवून परताताना दिसत होते.
***
*▶️दरवर्षी हा सोहळा घेण्याचे भाविकांकडून आवाहन*
यावर्षी प्रथमच लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पं. प्रदीप मिश्रा यांच्या वतीने भाविकांकडून आलेल्या पत्रांचे वाचन करण्यात आले. यामध्ये भाविकांनी या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक शंकर जगताप यांना ‘श्री अष्टविनायक शिव महापुराण कथे’चा सोहळा दरवर्षी घेण्याचे आवाहन केले. पं. प्रदीप मिश्रा यांनी हे पत्र वाचून दाखवितानाच भाविकाने केलेल्या आवाहनाला उपस्थितांनी भरघोस प्रतिसाद दिला. पंडित मिश्रांनी जगताप कुटुंबियांच्या अध्यात्मिक व धार्मिक कार्याचे कौतूक केले.