Google Ad
Editor Choice

नवी सांगवीत डी जे चा आवाज तर, … जुनी सांगवीत ‘सांगवीचा राजा’ च्या विसर्जन मिरवणुकीने जिंकली गणेश भक्तांची मने

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरात वरुण राजाच्या हजेरीत काही ठिकाणी पारंपरिक आरत्या म्हणून आपल्या लाडक्या गणरायाचे सातव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया, ‘पुढच्या वर्षी लवकर या”, असे आवाहन करीत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

बुधवारपासून (ता. ३१) गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती. घराघरात थाटात गणराय विराजमान झाले होते. वाढती महागाई असली तरीही आपल्या लाडक्या दैवताच्या स्वागतामध्ये काही कमी राहू नये यासाठी सार्वजनिक गणपती मंडळांचे गणेशभक्त मग्न असल्याचे चित्र सांगवी नवी सांगवी मध्ये काल (०७ सप्टेंबर) ला सर्वत्रच दिसत होते.

Google Ad

सांगवी व नवी सांगवी येथील पारंपरिक विसर्जन स्थळावर आरत्या म्हणून गणेश विसर्जन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा तसेच ‘चंद्ररंग पॅरामेडिकल कॉलेज’ (इन्स्टिट्यूटच्या) वतीने अंबुलन्स, प्रथमोपचार केंद्र व ३० विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव काळात गणेश विसर्जन पर्यावरण पूरक व्हावे, याकरिता सांगवीतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाटावर निर्माल्य कुंड ठेऊन येणाऱ्या गणेश भक्तांकडून हार, फुले तसेच इतर पर्यावरणला हानी पोहचविणारे साहित्य, वस्तू वेगवेगळ्या करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले.नवी सांगवीतील फेमस चौक येथे सर्व गणेश मंडळांचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ व शंकर जगताप मित्र परिवार, शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ, समर्थ नगर मित्र मंडळ यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी-नवी सांगवीत पोलिस कर्मचारी आपले कर्तव्ये बजावताना दिसत होते.

यावेळी नवी सांगवीतील कृष्णा चौक – क्रांती चौक – फेमस चौक मार्गे साई चौकातून ढोलताशांचा गजर आणि फटाक्यांची आतषबाजी, विधुत रोषणाई आणि आधुनिक तंत्रज्ञानातील डी जे च्या तालावर तरुणाई आणि गणेश भक्त थिरकताना दिसत होते.

जुनी सांगवीतही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महाराष्ट्र बँक चौक-शितोळे नगर- गजानन महाराज मंदिर रोड- विष्णुपंत ढोरे चौक या सर्वच रस्त्यावर गणेश भक्तांनी विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी करीत आपल्या लाडक्या गणपतींना भावपूर्ण निरोप दिला. यात सिझन ग्रुप सोशेल वेल्फेअर ट्रस्ट चा ‘सांगवीचा राजा’ च्या शांततामय वातावरणात मराठी कलाकारांनी बाप्पाच्या चरणी केलेल्या सेवेने गणेश विसर्जन मिरवणूकीने सांगवीकरांचे लक्ष वेधून घेतले.

पहा गणेश विसर्जन मिरवणुकीचा क्षणचित्रे 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!