Google Ad
Editor Choice

शिंदे – फडणवीस सरकारने सूड बुद्धीने वागून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची शिवभोजन थाळी बंद करू नये … रविकांत वर्पे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८सप्टेंबर) :  महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन थाळी ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. मविआ सरकारच्या काळात सुरु केलेली शिवभोजन थाळी ही आताचे ED अर्थात शिंदे – फडणवीस सरकार बंद करणार आहे. महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त सामान्य माणसाला राज्य सरकारने आणखी त्रासात ढकलून गोरगरीब मराठी माणसांच्या पोटावर लाथ मारू नये, असे केले नाही तर, सामान्य जनता ह्यांना ह्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी सरकारकडे केले आहे.

शिवभोजन थाळी ने कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या, रोजीरोटीची कामे बंद पडलेल्या कित्येक गरीब व गरजू जनतेला माफक दरात अन्न देण्याचं पुण्य केलं व संकट काळात आधार दिला.

Google Ad

कोरोना काळात हाताला काम नसलेला एक मोठा कामगार वर्ग आहे, अशा गरजू कुटुंबासाठी ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, मजुर, बेघर अवस्थेत असणाऱ्या नागरिकांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्न शिवभोजन थाळी च्या माध्यमातून सोडवला, असे वर्पे म्हणाले.

कोरोना काळातील अनेक जणांचे रोजगार गेले, छोटे-मोठे उद्योग बंद पडले, कोणाच्याही हाताला यावेळी काम नव्हते, महागाई सुद्धा वाढत आहे त्यामुळे गोर गरीब, कष्टकरी जनतेला माफक दरात पोटभर जेवण जेवायला मिळावं या हेतूने महाविकास आघाडी सरकारच्या संकल्पनेतुन ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. शिवभोजन थाळी चे जवळपास २००० केंद्र सुरु केले आणि ५ते१० रुपयात पूर्ण जेवण गोरगरिबांसाठी सुरु केलेआणि लोकांनी सुद्धा ह्या थाळीला प्रचंड प्रतिसाद दिला.
या शिवभोजन थाळीचा सुमारे ९ कोटी लोकांनी लाभ घेतला असल्याची माहिती वर्पे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

१० रुपयात शुद्ध पोटभर जेवण देण्याचा हा निर्णय ,कोरोना संकटात लाखो निराश्रित नागरिकांच्या पोटाचा आधार ठरला होता.

पण खोके खाऊन ओक्के झालेल्या ह्या गद्दार सरकारला मविआ सरकारची कावीळ झालीय म्हणूनच मविआ सरकारने घेतलेल्या अनेक लोकाभिमुख निर्णयांना ह्या सरकारने एकतर स्थिगिती दिली किंवा ते रद्द केले आहेत.

मेट्रो कारशेड कांजूर ला हलवणे, आरे मध्ये कारशेड च्या कामावर घातलेली बंदी, किंवा आताचा शिवभोजन थाळी, जे निर्णय लोकांच्या पसंतीस आले होते, ते सर्व निर्णय या खोके सरकारने रद्द करण्याचा किंवा विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला.

दुसर्याची रेष छोटी दाखवण्यासाठी आपली रेष मोठी ओढायची असते, दुसर्यांची कामे पुसून तुम्ही कोणता पराक्रम करताय ? असा सवालही वर्पे यांनी यावेळी केला आहे.

तुम्ही कितीही द्वेषाने वागला तरी ह्यात नुकसान महाराष्ट्राचे होत आहे, हे या गद्दार ED सरकारला कळत नाही.

पण जनता ह्यांना ह्यांची जागा नक्कीच दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे रविकांत वर्पे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे म्हटले आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!