Categories: Uncategorized

शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच दोषी आढळणाऱ्या शैक्षणिक संस्थावर कारवाई करावी … राहूल कोल्हटकर यांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ मे) : भारतीय संविधानाच्या कलम 21-अ अंतर्गत 6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करण्याची तरतूद, बालकांसाठीच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमात सविस्तर विशद केली आहे. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत असत्याचे मान्य करणा-या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान लाभले.

समाजातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मोफत मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा निर्माण झाला. त्यामाध्यमातून शहरातील अनेक खाजगी शाळामध्ये २५ टक्के जागा या घटकातील विद्यार्थी यांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत . पण शहरातील अनेक खाजगी शाळा शिक्षण हक्क कायद्याच्या नुसार या विद्यार्थी यांना प्रवेश देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत इंग्रजी , मराठी, माध्यमाच्या अनेक खाजगी शाळा आहेत . शिक्षण हक्क कायदा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा या कायद्याअंतर्गत नोंदणी करणाऱ्या अनेक शाळा होत्या पण आजच्या घडीला त्यातील अनेक शाळा यांची संख्या कमी झाली आहे. तसेच काही शाळांनी शिक्षण हक्क कायद्याच्या अंबलबजावणी मधून सुटका करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवून घेतला आहे आणि काही मिळवून घेत आहे.

हे निदर्शनात आले आहे.म्हणूनच गेल्या ५ वर्षात अशा चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्थेचे निकष पूर्ण न करता अल्पसंख्याक दर्जा मिळवणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांची चौकशी करून या शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राहूल रूपराव कोल्हटकर यांनी संजयजी नाईकडे प्रशासकिय अधिकारी शिक्षण विभाग,पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात राहूल रूपराव कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, शिक्षण हक्क कायद्याच्या प्रवेश प्रक्रियेला सध्या मुदत वाढ देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत प्रवेश दिलेल्या शाळांना राज्य सरकारच्या माध्यमातून अनुदान / प्रतिपूर्ती दिली जाते. त्यामुळे ज्या शाळेत विद्यार्थी याला प्रवेश मिळेल त्या शाळेत त्याला प्रवेश द्यावा लागतो . शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदी नुसार या प्रवेश दिलेल्या विद्यार्थी कडून इतर कोणतेही शुल्क किंवा निधी शाळांना घेता येणार नाही असा स्पष्ट निर्देश असताना सुद्धा शहरातील अनेक खाजगी शाळा ह्या शुल्क भरण्यास सांगत आहेत. त्यामुळे अनेक पालक हे अडचणीत आहेत राज्य सरकारच्या वतीने शुल्क मिळून सुद्धा ह्या शाळा जर पालकाच्या कडून शुल्क घेत असतील आणि राज्य सरकारने शुल्क दिल्यावर पालकांनी भरलेले शुल्क परत करू असे सांगत असतील तर अशा शाळांवर शिक्षण विभाग काहीच कारवाई करताना दिसून येत नाही.उलट शिक्षण विभाग शुल्क मागणाऱ्या शाळांची तक्रार करा मग कारवाई करू असे सांगत असेल तर ते चुकीचे आहे आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी कोणताच पालक शाळेची तक्रार करू शकत नाही हे शिक्षण विभागाने लक्षात घ्यावे आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार होणारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शहरस्तरीय / विभागीय समिती निर्माण करून ह्या सर्व प्रवेश प्रक्रियावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच पालकाचे प्रश्न अडचण सोडवण्यासाठी त्या समितीला कार्यरत राहण्याचे आदेश द्यावेत आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश निश्चित होऊनही जर कोणत्याही विद्यार्थी यांकडून जर कोणतेही शुल्क शाळेकडून आकारण्यात येत असेल तर अशा शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दुर्बल,वंचित घटकातील मुला मुलींना इतर विद्यार्थी प्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता भारतीय राज्य घटनेने दिलेला शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्रदान करणाऱ्या शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वरील उल्लेख केलेल्या प्रश्नावर विचार करून विद्यार्थी यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या शैक्षणिक संस्था यांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या शैक्षणिक संस्था यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून मा.श्री. संजयजी नाईकडे सर , प्रशासकीय अधिकारी,शिक्षण विभाग यांना करण्यात येत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

12 आणि 28% रद्द, आता फक्त 5 आणि 18% GST; अनेक वस्तू स्वस्त होणार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 04 सप्टेंबर :- सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि…

1 day ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निर्माल्य संकलन मोहिमेला पिंपरी चिंचवडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद … सात दिवसांत जवळपास ५२ टन निर्माल्य संकलित….

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील नदी,…

2 days ago

Breaking News : मनोज जरांगेंचा मोठा विजय.! ‘या’ सर्व मागण्या झाल्या मान्य… महायुती सरकारमुळे मराठयांचा आजचा दिवस सोन्याचा

महाराष्ट्र 14न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आरक्षणाच्या लढ्यात मोठी घडामोड घडली आहे. मनोज जरांगे यांच्या…

3 days ago

मनोज जरांगेंची जी मागणी मान्य केली ते ‘हैदराबाद गॅझेट’ नेमकं आहे तरी काय ?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 सप्टेंबर :- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानी…

3 days ago

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे …. प्रकल्प अहवालाचे सादरीकरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रस्तावित…

4 days ago

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

'महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या' म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय…

5 days ago