Google Ad
Editor Choice

ढोलताशांच्या गजरात रांगोळ्यांच्या पायघड्यानी पिंपळे गुरव मध्ये शोभायात्रेचे नागरिकांनी केले नववर्षाचे जल्लोषात स्वागत !

महाराष्ट्र 14 न्यून, (दि. ०२एप्रिल) : आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गुढी पाडवा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला.गेली दोन वर्ष पाडवा जल्लोषात साजरा करता आला नव्हता. पण आज पिंपरी चिंचवड शहरांसह विविध भागांमध्ये अत्यंत जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आल्या.

राज्यासह देशभरात आज गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे यंदा गुढीपाडव्याच्या सणाचा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्यानिमित्त नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत होता.

Google Ad

आज हिंदु नववर्षानिमित्त पिंपळे गुरव येथे शोभायात्रा काढण्यात आलेली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, भारतीय जनता पक्षाच्या, तसेच पिंपळे गुरव – नवी सांगवीतील नागरिकांच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती.

रथामध्ये रामाची मूर्ती विराजमान होऊन या रथयात्रेस पिंपळे गुरव भैरवनाथ मंदिरापासून प्रारंभ झाला, हनुमान मंदिर गावठाण – बँक ऑफ महाराष्ट्र चौक रामकृष्ण मंगल कार्यालय चौक- रविराज हॉटेल – नर्मदा गार्डन कृष्णा बाजार चौक- काटेपुरम चौक खाडे बाबा महाराज मठ – या भागातून ही शोभायात्रा झाली,यामध्ये आबालवृद्धांपासून सर्व महिलांचा सहभाग दिसत होता, सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते.

यात ढोलताशांच्या गजरात रथयात्रे पुढे नागरिकांकडून ठिकठिकाणी भव्य रांगोळ्यांचं आयोजन करण्यात आलं होत. मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आणि शोभयात्रेच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेले दिसून आले.

यावेळी ढोलताशांच्या गजरात पारंपरिक कपडे परिधान करुन
पुरुष आणि महिला वर्ग हा शोभायात्रेत अत्यंत हिरीरीने आणि नटून-थटून सहभागी झाल्याचे दिसत होते. यावेळी सर्वांकडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!