Google Ad
Editor Choice

Alandi : आळंदीच्या काळे काँलनीतील मैला मिश्रित सांडपाणी ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी … लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.२७ मे) : आळंदी नगर परिषदेच्या हद्दीतील काळे कॉलनीत गेल्या पाच वर्षापासून उघड्यावर ड्रेनेज लाईनचे मैला मिश्रीत पाणी वाहत होते,अनेक नागरिकांच्या घराच्या पाठीमागे व घराच्या पुढे ही मैलामिश्रीत घाण पाणी वहात होते.पुरेशी जागा आणि तांत्रिक अडचणी मूळे ड्रेनेज लाईनचे काम काही वर्षे रखडलेले होते.

काळे कॉलनीतील नागरिकांना त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांना गेली काही वर्षे तोंड द्यावे लागत होते. दोन वर्षापूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी मुख्याधिकारी अंकुश जाधव,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे व नगरसेवक अँड सचिन काळे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सांडपाणी, मैलामिश्रित पाण्याच्या निचऱ्यासाठी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण करून घेण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले.

Google Ad

कोरोना महामारी मूळे समस्या प्रलंबित होती.सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाजगी मालकांची संमती मिळवण्यासाठी सर्व काळे काँलनीतील रहीवासी व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे पदाधिकारी यांनी प्रयत्न केले व जागा मालक प्रकाश काळे,अँड सचिन काळे यांनी नगरपरिषद यांना संमती दिली.

-आरोग्याचा आणि पर्यवरणाचा प्रश्न गंभीर होत असल्यामुळे केला,मी सतत दोन वर्षे नगरपरीषदेकडे पाठपुरावा केला,स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वस्तीतील समस्या सोडवण्यासाठी खूप मदत केली असे अण्णा जोगदंड यांनी ड्रेनेज लाईनच्या कामाच्या उदघाटन समारंभाचे वेळी प्रास्ताविक करताना सांगितले.

उद्घाटन मा. नगरसेवक अँड सचिन काळे यांचे हस्ते झाले. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे,मानवी हक्क संरक्षण आणि जागृती शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,दीपक काळे, नगरपरिषदेचे अभियंता सचिन गायकवाड,अँड आनंत काळे ,सा.का.आसाराम गरड यांच्या हस्ते शुभारंभ करून काम चालू केले.

यावेळी नगरसेवक अँड सचिन काळे,दीपक काळे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड,अभियंता सचिन गायकवाड,अँड अनंत काळे, सामाजिक कार्यकर्ते आसाराम गरड,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश काळे,संदीप काळे,दत्ता चौधरी,महादेव पाटील,गुलाब व्यवहारे,लक्ष्मण गवळी, भरत गोरे,अनिल मोकाशे,किरण पांचाळ,अक्षय तापकीर,राजन काळे,आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!