Google Ad
Editor Choice

धक्कादायक बाब…. नालासोपारा मधिल एकमेव समेळगाव येथिल स्मशानभूमीची दुर्दशा प्रेत जळण्यास 24 तासाच्या वर लागतो वेळ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ सप्टेंबर) : नालासोपारा मधिल एकमेव समेळगाव येथिल स्मशानभूमीची दुर्दशा प्रेत जळण्यास 24 तासाच्या वर लागतात तसेच प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नालासोपारा (प) मधिल एकमेव समेळगाव येथे स्मशानभूमी आहे नालासोपारा (प) हा परिसर दाट लोकवस्तीचा परिसर आहे जास्त लोकसंख्या असल्याने मृत्युदर हि त्याप्रमाणात आहे.

सर्वात आधी मी कॉंग्रेस पक्षाच्या वतिने विद्युत शवदाहीनी बसवण्याची व सुरू करण्याची मागणी केली होती. विद्युत शवदाहिनी बसवली पण अद्याप पर्यंत महापालिकेला विद्युत शवदाहिनी सुरू करण्यास मुहूर्त मिळत नाही. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी लागणारे लाकडे ठेवण्याची कोणती हि सोय नसल्याने पावसामुळे लाकडे भिजल्याने अंत्यसंस्कारावेळी प्रेत अर्धवट जळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Google Ad

लाकडे भिजलेली असल्याने अंत्यसंस्कारावेळी अडचण निर्माण होत आहे. लाकडे ओली असल्याने ते पेटत हि नाही त्यामुळे किमान 8 ते10 टायर आणि डिझेलचा भरपुर वापर करून हि प्रेत जळण्यास 24 तास लागतात काहि प्रेत अर्धवट जळत असल्याने यामुळे प्रेताची विटंबना होत असल्याचा रूचिता नाईक यांनी चिंता व्यक्त केली. या साऱ्या प्रकारामुळे नागरीक आणि मृतांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते आणि बराच वेळ वाया जात आसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. स्मशानभूमीत सुपरवायझर 1 च असल्याने त्यांची वेळ सकाळी 7 ते 3 आहे 3 नंतर व रात्रीच्या वेळेस सुपरवायझर नसल्याने येथिल कर्मचारी यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार येथिल कर्मचाऱ्यांनी केली.

स्मशानभूमीची दुरूस्ती तसेच सोयीसुविधा व विद्युत शवदाहिनी सुरू करण्याबाबत आणि प्रभाग समिती ‘ई’ चे सहाय्यक आयुक्त वनमाळी व प्रभाग समिती बांधकाम विभागाचे अधिकारी संख्ये तसेच स्मशानभूमीची देखभाल करणारे थोरात यांची त्वरीत हकालपट्टी करून सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी कॉंग्रेस समेळगाव अध्यक्षा रूचिता नाईक या मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!