Google Ad
Editor Choice

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा … मुख्य समन्वय अधिकाऱ्यांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १ ऑगस्ट २०२२):- महापालिकेच्या वतीने आज आठही क्षेत्रीय कार्यालयात पार पडलेल्या जनसंवाद सभेत सुमारे ९६ नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.

 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार आज महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे ९, १५, ८, १०, १५, ५, २३ आणि ११ नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

Google Ad

महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत जनसंवाद सभा पार पडली. एकूण अकरा तक्रारी अर्ज दाखल झाले होते. यावेळी सभेला महापालिकेचे नवनिर्वाचित उपायुक्त आरोग्य तसेच मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता विद्युत दिलीप धुमाळ, स्मार्ट सिटी अभियंता मनोज सेठिया, स्थापत्य अभियंता अनिल शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ह क्षेत्रीय कार्यालयात नव्याने उपस्थित असलेले मुख्य समन्वय अधिकारी अजय चारठणकर यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित निराकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले यापुढे कोणत्याही समस्या असोत त्याची गंभीरपणे दखल घेऊन नव्वद टक्के समस्या सोडविणे अत्यावश्यक आहे. यामध्ये कोणतीही कसर राहता कामा नये.

गणेशोत्सव लवकरच येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रस्ते स्वच्छता, कचऱ्याचे निवारण, पाणी पुरवठा, विद्युत दिवे, राडारोडा याबाबत सर्वोतोपरी नागरिकांना त्रास होणार नाही अशी काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. हर घर तिरंगा या अंतर्गत सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी, संबंधित अधिकारी यांना दिले.
जनसंवाद सभेत पिंपळे गुरव येथील रस्त्याची दुरवस्था, डांबरीकरण करणे, पिंपरी स्टेशन येथील अतिक्रमण हटविणे, ड्रेनेज तुंबने आदी तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींवर मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!