Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच महत्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज दुस-या दिवशीही सुरु

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २८ एप्रिल २०२३ :- शहरामधील प्रमुख रस्ते, पदपथ तसेच महत्वाच्या चौकात असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई आज दुस-या दिवशीही सुरु असून यामध्ये टपरी, हातगाडी, फ्लेक्स, पत्राशेड आदींवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली. 

          प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्या नियंत्रणाखाली शहरातील सर्व प्रभागामध्ये अतिक्रमण धडक कारवाई सुरु आहे.  या कारवाईला  दि. २७ एप्रिल रोजी सुरुवात झाली.  पहिल्या दिवशी गुरुद्वारा चौक ते धरमराज चौक, चिखली, बो-हाडेवाडी, शिवरोड, उद्यमनगर, भोसरी एमआयडीसी, कल्पतरु सोसायटी ते जगताप डेअरी, सांगवी फाटा ते काळेवाडी फाटा, सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालय चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते छावा चौक, भोसरी – आळंदी रोड, पीएमटी चौक, गव्हाणे वस्ती, रत्ना हॉस्पीटल परिसर यमुनानगर, डिलक्स चौक पिंपरी या भागात धडक अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यामध्ये ३९ हातगाड्या, १ टेम्पो, ८ टप-या, ४० झोपडीवजा शेड, २ शेड, २ पत्रा शेड, ६२० किऑक्स, १५ बॅनर, २५ बोर्ड, ४७ फ्लेक्स हटविण्यात आले.

        दुस-या दिवशीदेखील विविध भागात अतिक्रमण पथकामार्फत कारवाई सुरु आहे.  शहरामधील प्रमुख रस्ते, फुटपाथ यावर बेशिस्त वाहने पार्क केल्याच्या तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या.  अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स आदींबाबत आणि टप-या तसेच पदपथावरील झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.  पर्यायाने अपघात होण्याची शक्यता असते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या नागरिकरणासोबत विविध समस्यादेखील निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक व रहदारी हिताच्या दृष्टीने शहरातील सर्व प्रमुख रस्ते अडथळे विरहीत असणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा विचार करुन महापालिकेने सर्व प्रभागांमध्ये धडक अतिक्रमण कारवाई हाती घेतली आहे.  सलग तीन दिवस चालणा-या या कारवाईमध्ये शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणावर सरसकट  निष्कासन कारवाई करण्यात येत आहे.  यामध्ये २२ हातगाडी, ६० टपरी, २ टेम्पो, ५३० फ्लेक्स बॅनर किऑक्स, ७० जाहिरात बोर्ड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले तसेच अंदाजे २२ हजार ८५० चौरस फुट जागेमध्ये असलेले ४५ पत्राशेड निष्कासीत करण्यात आले.

 या कारवाईत महापालिकेचे संबंधित क्षेत्रीय अधिकारी, अभियंते, अधिकारी कर्मचारी, अतिक्रमण निरीक्षक, बीट निरीक्षक, पोलीस दल, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे जवान नियुक्त करण्यात आले असून १३ डंपर, ५ क्रेन, ३ जेसीबी, ३ पिंजरा वाहने  अशा विविध यंत्रणांचा वापर या कारवाईमध्ये  करण्यात येत आहे.  आज निगडी परिसर, कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर रोड, चिखली, सेक्टर नं. १०, मोहननगर चिंचवड, डांगे चौक परिसर, ह प्रभागातील महत्वाचे रस्ते, डी. वाय पाटील रोड, जाधववाडी, निगडी ओटा स्कीम, स्पाईन रोड, इंद्रायणीनगर भोसरी, जुनी सांगवी आदी भागात अतिक्रमण निष्कासन कारवाई सुरु करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली असून उद्या दि. २९ एप्रिल रोजी देखील धडक कारवाई सुरु राहणार आहे.  यामध्ये चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, जाधववाडी, चिखली, देहू आळंदी रोड, औंध रावेत रोड, पिंपळेगुरव, भोसरी परिसर, दिघी परिसर, मोशी, बोपखेल परिसर, वाकड, थेरगाव, रहाटणी, सांगवी, दापोडी अशा विविध ठिकाणांचा समावेश असणार आहे.  

Maharashtra14 News

Recent Posts

आकुर्डी येथे माणुसकी पूर्णपणे संपली असल्याचे चित्र … नेपाळ धुमसत असताना एका नेपाळी तरुणाकडून मुक्या प्राण्याची तलवारीने निर्दयीपणे हत्या.!!!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…

5 days ago

सभासदांना १५% लाभांश देत, आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…

6 days ago

पायलट लायसन्स सेमिनार २१ सप्टेंबरला … पायलट होण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…

1 week ago

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…

1 week ago