Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad Pune

रेमडेसिवीर इंजेक्शन करीता दिलेला नंबर सतत व्यस्त … माजी खासदार गजानन बाबर यांची जिल्हाधिकारी यांना दखल घेण्यासाठी विनंती!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १२ एप्रिल) : कोरोना विषाणूने पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरश थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये रेमडीसीवर  इंजेक्शन हे अत्यंत उपयुक्त ठरत असून त्याचा खूप तुटवडा भासत आहे तसेच ह्या इंजेक्शनचे काळा बाजार  होण्याचे प्रकार पुणे जिल्ह्यामध्ये वाढत आहेत . तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळण्यासाठी आपल्या जीवाचे रान करावे लागत आहे आज आपण जर पाहिले तर हे इंजेक्शन सहजासहजी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.

या इंजेक्शन करीता कंट्रोल रूम नंबर   020-26123371 जाहीर केला आहे परंतु हा नंबर सुद्धा बहुतांश व्यस्त लागत असून नागरिक हैराण झाले आहेत तरी आपण नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी कंट्रोल रूम नंबर की संख्या वाढवावी जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना अधिकारीवर्ग सहजासहजी उपलब्ध होतील व रेमडेसिविर सारखे इंजेक्शन मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत होईल असे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Google Ad

तसेच या इंजेक्शनचा काळा बाजाराची प्रमाण वाढले आहे असे वर्तमानपत्रातून ही कळते तरी यावरही आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात व नागरिकांना रुग्णांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर इंजेक्शन कसे उपलब्ध होईल याची आपण काळजी घ्यावी अशी विनंती गजानन बाबर यांनी पुणे जिल्ह्यातील तमाम नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना केली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!