Google Ad
Uncategorized

स्त्री सन्मानासाठी नवनिर्वाचित आमदार ‘शंकर जगताप’ यांचे पुढचं पाऊल, आपल्या कार्यालयाबाहेरील पाटीवर लावले आईचे नाव

Yaw:181.55164,Pitch:0.543735357592635,Roll:-0.6583624378088189

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२६ नोव्हेंबर : सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्याही नावाचा समावेश असेल असा मोठा निर्णय राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. याचाच धागा पकडत चिंचवड चे नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी स्त्री सन्मानासाठी पुढचं पाऊल उचलत त्यांनी आपल्या कार्यालयाबाहेर असणाऱ्या पाटीवर  ‘श्री शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप’ ‘आमदार चिंचवड विधानसभा’ असा फलक लावल्याने स्त्री सन्मानासाठी स्वतः पासून याची सुरुवात केल्याचे दिसून आले.

सरकारी कागदपत्रांमध्ये व्यक्तीच्या नावासोबत आईचेही नाव बंधनकारक असेल, असा महत्वाचा निर्णय महायुतीच्या राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या बालकांच्या कागदपत्रांमध्ये वडिलांसह आईचेही नाव असेल, असे या नव्या निर्णायानुसार स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव बंधनकारक असणार आहे.

Google Ad

महाराष्ट्रानं स्त्री सन्मानाच्या आणि स्त्रियांच्या हक्काच्या दृष्टीनं नेहमी प्रागतिक भूमिका घेतलेली आहे. देशातील स्त्री शिक्षणाचा पाया देखील महाराष्ट्राच्या भूमीत रचला गेला. त्याचच आदर्श आमदार शंकर जगताप यांच्याकडून जोपासला जातो आहे. महाराष्ट्र सराकरकडून महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!