Categories: Uncategorized

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांची जयंती साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज,(: १५ फेब्रुवारी) : नवी सांगवी -येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित , दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ मा.ऐश्वर्याताई रेनुसे जगताप , शिवानी सावंत, राजेश्वरी सावंत , वीरेन जगताप, मा. स्वाती पवार , कॉलेजच्या प्रिन्सिपल मा. इनायत मुजावर , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका जयश्री माळी डॉ.देविदास शेलार, मा.देवराम पिंजन ,उपस्थित होते.

प्रथमत: प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्व. लक्ष्मणभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. लक्ष्मणभाऊंची आठवण म्हणून सर्व विद्यार्थ्यांना केकचे वाटप करण्यात आले. नंतर लक्ष्मणभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा रंजना आहेर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून घेतला .

एक लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून सगळ्यांच्यासाठी किती महत्त्वाचे होते हे आपल्या आठवणीतून कु. रिया धोंगडी इ. ९वी व सविता हिराळे इ. ४ थी या विद्यार्थिनींनीही आपल्या मनोगतातून भाऊंच्या बद्दल आपली मनोगते व्यक्त नंतर प्राजक्ता पुरोहित मॅडम व थिगळे मॅडम यांनी भाऊंच्या यशाचे रहस्य व कार्याचा गौरव मनोगतातून व्यक्त केला.

शेवटी मा.ऐश्वर्या ताई रेणुसे जगताप यांनी एक वडील म्हणून भाऊ किती महान होते हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तेव्हा सर्वांचे मन भरून आले व भाऊंच्या आठवणीने सर्वांना गहिवरून आले.अशा या कार्यक्रमांसाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. विजय जगताप, सदस्य स्वाती पवार, देवराम पिंजन व सर्व संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ रंजना आहेर मॅडम यांनी केले. शेवटी सर्वांचे तोंड गोड करून पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री बाळासाहेब शेलार यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 जुलै : भोसरी (पुणे)- गाडी लोहार समाज उन्नती मंडळ , कल्याण…

3 days ago

चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने गुरूजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

गुरुजनांच्या सहवासाने रंगलेला सोहळा..!! महाराष्ट्र 14 न्यूज, दि.05 जुलै : गुरुजनांच्या प्रति प्रत्येकाच्या मनातून व्यक्त…

2 weeks ago

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

1 month ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

1 month ago