महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ सप्टेंबर) : पिंपळे गुरव, नवी सांगवीच्या मध्यावर असलेल्या सह्याद्री कॉलनीचे काही लोकांनी अचानक नाव बदलल्याने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करीत बदलेला श्रावस्ती बौद्ध विहार नावाचा फलक काढून पुन्हा ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक पूर्ववत बसविला. विशेष म्हणजे श्रावस्ती बौद्ध विहार या फलकावर महापालिकेचे चिन्ह व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा उल्लेख होता.
गेल्या वीस वर्षांहून अधिक जुनी असलेल्या सह्याद्री कॉलनीचे नाव अचानक बदलण्यात आले. त्याजागी श्रावस्ती बौद्ध विहार नामकरणाचा फलक लावण्यात आल्याने परिसरात नागरिकांमध्ये, युवकांमध्ये चर्चा होऊ लागली. हा फलक नेमका कोणी लावला, हे अद्याप कुणालाही माहीत नाही. ह क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही हा फलक नेमका कुणी लावला याबाबत माहीत नाही.
वर्षभरापूर्वी मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण, पदपथ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. हे काम सुरू असताना ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तात्पुरता काढून टाकण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ‘श्रावस्ती बौद्ध विहार’ या नावाचा फलक उभा करून त्यावर महापालिकेचे चिन्ह, तसेच ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका’ असा उल्लेख करून हा फलक अज्ञात व्यक्तीने लावून येथील परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडवून दिली.
यावेळी परिसरातील नागरिकांनी आमचे आधारकार्ड, पॅन कार्ड, लाईट बिल, पाणी पट्टी, टॅक्स पावती आदी कागदपत्रांवर पूर्वीपासून सह्याद्री कॉलनी असा पत्ता असताना येथील सह्याद्री कॉलनीचे नाव बदलून श्रावस्ती बौद्ध विहार या नावाचा फलक कसा काय लावला जावू शकतात. कुणाची परवानगी घेऊन हा फलक या ठिकाणी लावण्यात आला. या ठिकाणी असलेल्या ट्रस्टचाही पत्ता सह्याद्री कॉलनी आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम नेमकं कोण करीत आहे ? असा सवाल येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.
नागरिकांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी हे कृत्य चुकीचे आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष न करता सदर फलक नावात बदल करून कोणी लावला, याचा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आयुक्तांकडे देणार असल्याचे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. येथील परिसरातील नागरिकांमध्ये असा असंतोष पसरवून नेमके काय साध्य करायचे आहे ? याचाही शोध घेण्यास सांगण्यात येणार आहे.
यावेळी लोकप्रतिनिधी, तसेच नागरिकांनी स्व:खर्चाने त्वरित ‘सह्याद्री कॉलनी’ नावाचा फलक तयार करून अवघ्या तासाभरात त्याच ठिकाणी काही अंतरावर उभा करून त्या फलकाला राजेंद्र जगताप व उपस्थित नागरिकांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. याप्रसंगी शंकर रेणुसे, संदेश भोसले, बाळासाहेब मखरे, बळवंत बनसोडे, सुधाकर सूर्यवंशी, सुखदेव शिंदे, एस. बी. शिंदे, हरिवंश राम, गणेश मराठे, राहुल बडे, ज्ञानेश्वर चौधरी, विजय वराडे, संतोष बिबवे यांच्यासह सह्याद्री कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर ठिकाणी फलक लावण्यासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. पालिकेकडून कोणीही सध्या फलक लाववलेला नाही. आधीच्या नावाप्रमाणेच फलक लावणे बंधनकारक आहे. उद्या मी स्वतः पाहणी करतो. बेकायदेशीर फलक असल्यास संबंधित विभागाकडून तो फलक काढून जप्त करण्याचे आदेश देण्यात येतील.
उमेश ढाकणे, ह क्षेत्रीय अधिकारी
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…