महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ फेब्रुवारी) : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा दिल्ली येथून आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तसेच सहा तारखेला उमेदवार अर्ज दाखल केला जाणार आहे. अशी माहिती भाजपचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणुक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट यांच्या सह विविध संघटना आणि कसबा विधानसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची बैठक झाली.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…