Google Ad
Editor Choice

“मावळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी” … शिवभक्तांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट)  :  शनिवारी पुणे जिल्ह्यातील कोथुर्णे, मावळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी , सात वर्षीय बालिकेची हत्या करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व चिमुकलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवभक्तांच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात आले . यावेळेस जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन

▶️शिवभक्तांनी अशा केल्या मागण्या :-

Google Ad

१ ) नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे .
२ ) हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा .
३ ) महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी .
४ ) विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावून पोक्सो कायदा कडक करण्यात यावा , तसेच मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातदेखील पोक्सो कायद्यात फाशीची तरतूद करण्यात यावी .
५ ) शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस कर्मचारी नेमण्यात यावा .

यावेळेस श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान , महिला सुरक्षा संघटना , शिवस्वप्न साकार प्रतिष्ठान , अखिल भारतीय मराठा महासंघ , राजे शिवराय प्रतिष्ठान , विश्व हिंदू मराठा महासंघ , भगवे ट्रेकर्स , एमटीएसएसडी वर्कस युनियन दिवांकुर बहु . सा . संस्था यांसह पुणे शहरातील सुजाण नागरिक , तसेच बारा मावळातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!