Categories: Editor Choice

माजी नगरसेवक शंकरशेठ पांडुरंग जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त ” काश्मीर फाईल्स ” या चित्रपटाची पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवीकरांना पर्वणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ एप्रिल) : सध्या देशभरात विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने देशभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पासूनच हा चित्रपट सगळीकडे चर्चेत आहे. देशभरातील प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे. तसेच या चित्रपटाने देशाच्या राजकीय क्षेत्रातही खळबळ माजवली आहे. त्यामुळे लोकांमध्ये ही या चित्रपटाची क्रेझ वाढायला लागली आहे.

माजी नगरसेवक शंकरशेठ पांडुरंग जगताप ( निवडणूक प्रमुख, भाजपा चिंचवड विधानसभा मतदारसंघ तथा माजी नगरसेवक पिं.चिं.मनपा) यांच्या वाढदिवसानिमित्त ” काश्मीर फाईल्स” हा चित्रपट पिंपळे गुरव, नवी सांगवी व सांगवी मधील नागरिकांसाठी श्री.शंकरशेठ जगताप मित्र परिवाराच्या वतीने मोफत दाखविण्यात आला.

त्याप्रसंगी पिंपळे गुरव, सांगवी परिसरातील नागरिक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला, मुले आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मातृभूमीवर आधारित हा चित्रपट मोफत प्रदर्शित करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम केल्याबद्दल त्यांचे व मित्र परिवाराचे अभिनंदन केले.

दरम्यान द काश्मिर फाइल्स चित्रपटाची कथा १९९० च्या दरम्यान काश्मिरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या अन्याय अत्याचारावर आधारित आहे. चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी काम केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

6 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

6 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

7 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

7 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

2 weeks ago