पर्यटन मंत्री हे एका अपघातातून थोडक्यात बचावले … सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेर झाला अपघात!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४जून) : महाविकास आघाडीतील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेर झालेल्या अपघातातून ते बाचवले. अतिथीगृहाच्या बाहेर असलेलं मोठं झुंबर पीओपी स्लँबसह कोसळलं. अपघात झाला तेव्हा आदित्य ठाकरे आत बैठक घेत होते. त्यामुळं या घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे शुक्रवारी सायंकाळी बैठकीच्या निमित्ताने सह्याद्री अतिथीगृहामध्ये आले होते.

याठिकाणी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याबरोबर सभागृहात त्यांची बैठक सुरू होती. मात्र आतमध्ये ही बैठक सुरू असताना बाहेरच्या भागात असलेलं शोभेचं मोठं झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. मात्र ही दुर्घटना अत्यंत गंभीर होती. त्यामुळं सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.

दरम्यान, अपघात झाला त्याठिकाणचं बांधकाम हे 25 वर्षांपूर्वीचं आहे. या सर्व इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेलं आहे. त्या संपूर्ण इमारतीचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यानंतरच याबाबत प्रतिक्रिया देण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान, संबंधित दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करण्यात आलं आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

19 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago