Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थी यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यास मान्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, ११ जुलै २०२३:-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थी यांना प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम ई. सी. एस. द्वारे देणेकामी गुणवंत विद्यार्थी सत्कार योजना धोरण राबविण्यास तसेच त्यासाठी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. यासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज मंजुरी दिली.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.यावेळी मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांचेकडील ७७ सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीबाबत नव्याने करारनामा करणे तसेच त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १९ चिंचवड सि. स. नं. ३८७६ (वार्ड सेंटर) या ठिकाणी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय सिटी ऑपरेशन तसेच डिजास्टर रिकव्हरी सेंटर विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
जे. एन. एन. यु. आर. एम शहर झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड पॅकेज क्र. ७ अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.


मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विभाग क्र. १० अंतर्गत मोरवाडी येथे कॉक्रीटीकरण करणे, कामात अडथळा ठरणारे मराविवि कंपनीचे उच्चदाब व लघुदाब वाहिनी व पोल स्ट्रक्चर हलविणे तसेच अनुषांगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे ह प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी उभारणेत आलेल्या सी. सी. टी. व्ही. यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरूस्ती करणेकामी मान्यता देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील अ, ब, क, ड, ई, फ, ग व ह या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अनधिकृत बांधकामांवर कारवाईकामी विविध प्रकारची यंत्रसामृगी पुरविणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ६ मध्ये चक्रपाणी वसाहत व परिसरात देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच नवीन भोसरी रुग्णालय व इतर मनपा इमारतींची देखभाल व दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्र. २० संत तुकारामनगर मधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या ग प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक ठेकेदारी पद्धतीने आणि ह प्रभागातील जलनि:सारण नलिकांची वार्षिक यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणे व चोकअप काढणे या कामासाठी ६ महिन्यांसाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.महानगरपालिकेच्या पीजीआय – वायसीएमएच व मासुळकर कॉलनी येथील नेत्ररोग हॉस्पिटलकरिता फ्रीज खरेदी करणेकामी तसेच शिक्षण व रुग्णालय विभागासाठी कॉम्प्युटर टेबल खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मालमत्ता कर सवलत योजनेसाठी जनजागृती करणेकामी, रिक्षा स्पीकर सेटसह पुरविणेबाबत तसेच आरोग्य विभागासाठी बायोलॉजिकल मल्टीपरपज रॅपीड ऑक्सीजीनेटेड पावडर आणि डीओड्रन्ट्स (डिसइन्फेक्टंट्) खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
क्रांतीवीर चापेकर वाडा येथे ऑडिओ-व्हिडीओ व्हिज्वल, प्रोजेक्शन मॅपिंग व विविध डिजीटलायझेशन विषयक कामकाज करणेसाठी सल्लागार नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्र. १ मधील दवाखाना, शाळा इमारत व सार्वजनिक इमारतींची देखभाल दुरूस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
काळेवाडी पवनानगर, विजयनगर, शांतीनगर, आदर्शनगर तसेच मनपाचे अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत संभाजीनगर, शाहुनगर परिसरामध्ये जुन्या जलनि:सारण नलिका बदलणे, ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी मान्यता देण्यात आली.


तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केलेल्या मानधनावरील विविध पदांना सुधारीत किमान वेतनाप्रमाणे मानधन वाढविणे आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाच्या अ प्रभाग अंतर्गत विविध ठिकाणी उभारणेत आलेल्या सी. सी. टी. व्ही. यंत्रणेची वार्षिक तत्वावर देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीला कामाला गती! … नागरिकांना मिळणार महापालिकेच्या सर्व सुविधा एकाच छताखाली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…

7 hours ago

चार वर्षात ६४ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला थकबाकी नसलेल्याचा दाखला

  यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…

10 hours ago

जवानांना राख्या बांधून सांगवीच्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा रक्षाबंधन सण उत्साहात

  आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…

14 hours ago

रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद २३ वर्षांच्या अथक प्रवासात ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४५०० प्रयोगांचा यशस्वी पल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…

15 hours ago

कबुतरे महत्त्वाची, रहिवासी नाहीत का ?? नागरिकांनी केला मोठा प्रश्न तर, पुण्यातही वाद पेटला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…

1 day ago

देवांग कोष्टी समाजातील मागील दीड वर्षापासून चा वाद संपुष्टात

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…

1 day ago