Google Ad
Editor Choice political party

Jalna : रावसाहेब दानवे, म्हणाले … महाविकास आघाडी सरकारमुळेच मराठा समाजावर …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९मे) : फडणवीस सरकारच्या काळात दिलेले आणि उच्च न्यायालयात टिकलेले मराठा आरक्षण आताच्या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. सरकार व त्यांच्या नेत्यांमध्ये नसलेला समन्वय, एक मत याचा परिणाम आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून आला. आरक्षण कायदा रद्द होण्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार व त्यांचे नेते जबाबादार असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

जालना येथे पत्रकारांशी बोलतांना दानवे यांनी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकायलाच पाहिजे होते, असा दावा करतांनाच सरकार बाजू मांडण्यात कमी पडले असा आरोपही केला. रावसाहबे दानवे म्हणाले, भाजपचे सरकार राज्यात असतांना फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्यासाठी मागसवर्ग आयोगाची समिती स्थापन करून गायकवाड समितीच्या अहवालाच्या निष्कर्षावरून आरक्षण दिले होते.

Google Ad

दरम्यान, आता ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा दिल्लीत देखील घुमणार आहे. कारण, मराठा समाजाचे प्रश्न देशासमोर मांडण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिन ९ ऑगस्ट रोजी दिल्लीत पहिली गोलमेज परिषद घेणार असल्याचं शुक्रवारी संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. यावेळी, राज्यातील सर्व आमदार-खासदार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थित राहावं यासाठी मी आमंत्रित करतोय, असं भाष्य संभाजीराजे यांनी केलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!