अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड सेंटरला केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. अरविंद सिंग कुशवाह यांची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज ,( दि . ८ ऑक्टोबर २०२० ) : शासन तसेच महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उत्तम वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करुन दिली आहे . कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास या आजाराचा उपचार घेण्यासाठी नागरिकांनी प्राधान्याने कोविड सेंटरमध्ये दाखल होवून वैद्यकीय उपचार घ्यावेत असे आवाहन भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाचे प्रमुख नागपुर येथील ऑल इंडीया इन्स्टिटयुट ऑफ मेडीकल सायन्सेसचे ( एम्स ) अतिरिक्त प्राध्यापक डॉ . अरविंद सिंग कुशवाहा यांनी केले .

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पथकाने पिंपरी चिंचवड शहरातील कोविड – १ ९ अंतर्गत उभारण्यात आलेल्या विविध कोविड सेंटरला भेट देवून पाहणी केली . महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा – या विविध उपाययोजनांचा आढावा देखील या पथकाने घेतला . डॉ.कुशवाहा यांचे समवेत नागपुरच्या एम्सचे डॉ . एस . बॅनर्जी होते . आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संगणकीय सादरीकरणाव्दारे शहरातील कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सद्यस्थितीबद्दल माहिती दिली .

यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटिल , उप आयुक्त अजय चारठणकर , अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे , महिला वैद्यकीय अधिकारी डॉ . वर्षा डांगे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे डॉ.सुनिल पवार , डॉ.परमानंद चव्हाण आदी उपस्थित होते . पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरला पथकाने भेट देवून तेथील यंत्रणेची माहिती घेतली . डॉ . संदेश कपाले यांनी या सेंटरच्या कामकाजाची माहिती दिली .

या सेंटरचे काम व्यवस्थित चालु असल्याबद्दल डॉ . कुशवाहा यांनी समाधान व्यक्त केले . कोरोना आजाराने बाधित झालेल्या रुग्णांवर याठिकाणी उपचार केल्यानंतर डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचा डॉ.कुशवाहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सदृढ आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . त्यानंतर पथकाने पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट देवून तेथील यंत्रणेची पाहणी केली . शहरातील कोविड – १ ९ अंतर्गत केलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल डॉ.कुशवाहा यांनी महापालिकेचे कौतुक केले . महापालिका “ माझे कुटुंब माझी जबाबदारी ” मोहिम चांगल्या पध्दतीने राबवत आहे .

सर्व्हेक्षणातुन प्रत्यक्ष परिस्थिती समोर आल्यानंतर कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक सक्षमतेने उपाययोजना राबवणे शक्य होणार आहे . भविष्यातील कोरोनाच्या आजाराचा प्रसार विचारात घेता त्यानुसार व्यवस्थापनाचे नियोजन वेळेत करणे आवश्यक असल्याचे डॉ.कुशवाहा यांनी सांगितले .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

6 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago