Google Ad
Editor Choice

कुळे गावातील ऐतिहासिक सलग साठ वर्ष चालत आलेल्या संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या आनंद उत्साहात पार पडला.*

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ मे) : कुळे गावातील ऐतिहासिक सलग साठ वर्ष चालत आलेल्या संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या आनंद उत्साहात पार पडला.सालाबादप्रमाणे पंचशील तरुण मंडळ कुळे यांच्यावतीने तथागत महाकारूणी गौतम बुद्ध,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,आरक्षणाचे दैवत शाहू महाराज व विश्वरत्न परमपूज्य महामानव घटनेचे शिल्पकार या देशाचे उद्धारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.

संलग्न ६० वा संयुक्त जयंती महोत्सव पंचशील तरूण मंडळ कुळे गाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे सभा अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील दादू भालेराव सुत्रसंचलन किरण भालेराव प्रास्ताविक उमेश मराडे (अध्यक्ष) त्यानिमित्ताने पुणे जिल्हा व मुळशी तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष गोविंद निकाळजे भाई पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी,काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना रासपा आशा सर्व पक्षांतील राजकीय शैक्षणिक सामाजिक कार्यकर्ते हजर राहून व माजी सभापती सन्माननीय रविंद्र बाबा कंधारे संभवे गावचे महिला कार्यकर्त्या वंदना जाधव काँग्रेस पक्षाचे युवा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मधुरभाऊ दाभाडे,उद्योजक अरुणभाऊ मराठे आणि वक्ते इतिहास अभ्यासक विक्रमसिंह मगर यांचें उत्कृष्ट भाषण मोलाचे मार्गदर्शन विचार मांडले पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सन्माननीय श्रीकांतजी कदम रात्री उशिरा ३-०० वाजता भेट देऊन मोलाचं मार्गदर्शन केले.

Google Ad

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लाभली ती सिनेअभिनेत्री सुवर्णा चौथे तसेच झुंड सिनेमातील कलाकार सदानंद स्वामी,निक्सन डिस्कोटा,संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनाचे संजय मराठे,भाजप पक्षाचे पंकज सारसर,राष्ट्रवादी पार्टीचे रवी खोकर या सर्व मान्यवरांचे शेवटी अध्यक्ष उमेश मराडे यांच्याकडून मनापासून आभार प्रदर्शन करण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!