Google Ad
Editor Choice Maharashtra

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील गोरगरीबांची घरे आता लख्ख प्रकाशाने उजळणार … ह्यूमन सोशेल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष ‘कैलास बनसोडे’ करणार मार्गदर्शन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०जून) : अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील गोरगरीबांची घरे आता लख्ख प्रकाशाने उजळणार आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आतापर्यंत ग्रामीण भागातील सदर प्रवर्गातील अनेक कुटुंबांना घरगुती वीज जोडणी घेणे शक्य झालेले नाही. त्यांच्यासाठी महावितरणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना आणली असून त्या माध्यमातून अवघ्या पाचशे रुपयांमध्ये वीज जोडणी दिली जाणार आहे. याबाबत मा . श्री . कैलास गहिनीनाथ बनसोडे ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील अनेक कुटुंबांच्या घरात आजही अंधार आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारच्या निर्देशानुसार महावितरणने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना सुरू केली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

Google Ad

तसेच त्याने आधारकार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्रासह महावितरणकडे अर्ज करावा. त्याचबरोबर पाचशे रुपयांची अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. सदर रक्कम पाच हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत दिली आहे. ती कशी भरायची या बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर अर्ज आल्यानंतर महावितरण परिसरात वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा असतील तर संबंधिताला अवघ्या पंधरा दिवसांत वीज जोडणी देणार आहे. त्यामुळे याचा अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील कुटुंबांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा . श्री . कैलास गहिनीनाथ बनसोडे अध्यक्ष ह्यूमन सोशेल डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

▶️मार्गदर्शना करिता येथे करा संपर्क :-

श्री. कैलास गहिनीनाथ बनसोडे
PRESIDENT , HUMAN SOCIAL DEVOLOPMENT ASSOCIATION MAHARASHTRA STATE .
Facebook /kailas.bansode.9

+91 70665 37777/ 020-27257777

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!