Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

महिलेला परराज्यातील हॉटेल मॅनेजरने पाठवला पॉर्न व्हिडिओ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) : कामानिमित्त परराज्यात गेले असताना हॉटेलमध्ये राहून गेलेल्या महिलेला हॉटेल मॅनेजरने व्हॉट्सअॅप वरती पॉर्न व्हिडिओ पाठवल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली आहे . याप्रकरणी हॉटेल मॅनेजर विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शुक्रवारी हा प्रकार घडला . याबाबत पिडीत महिलेने शनिवारी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार हॉटेल श्रीकोट केस्टल , श्रीकोट गंगानाली , श्रीनगर गढवाल येथील हॉटेल मॅनेजर चमोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिला या कामानिमित्त हॉटेल श्रीकोट केस्टल येथे ऑगस्ट२०२१ मध्ये राहण्यासाठी गेल्या होत्या . त्यावेळी हॉटेल मॅनेजरला रूम घेण्याकरिता त्यांनी आपला मोबाईल नंबर दिला . या नंबरच्या व्हॉट्सअॅप वरती हॉटेल मॅनेजरने आपल्या मोबाईल वरून पॉर्न व्हिडिओ (अशील व्हिडीओ) पाठवला , असे फिर्यादीत नमूद केले आहे . सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!