Google Ad
Editor Choice

सत्तेचा खेळ रंगणार … या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने थेरगाव, वाकड मध्ये भाजपची ताकद वाढणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : राज्यात लवकरच स्थानिक संस्थांचे बिगुल वाजणार आहे. स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर आता राजकारण ढवळुन निघायला लागले आहे, असं म्हणायला हरकत नाही. निवडणूक तोंडावर आल्याने आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. त्यामुळे २०२२ ला सत्तेचा खेळ जोरात रंगणार यात शंका नाही.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करणारे नारायण बारणे व रोहित बारणे यांच्यासह थेरगाव, वाकड भागातील अनेक कार्यकर्त्यांनी तसेच वाकड मधील युवा कार्यकर्ते अभिजित गायकवाड, विक्रम कलाटे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत(दि. ०३ ) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Google Ad

या प्रवेशासाठी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे व विशाल कलाटे यांनी पुढाकार घेतला.यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी सदाशिव खाडे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपाचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, गणेश गुजर, नगरसेवक विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.

वाकड आणि थेरगाव भागातील कार्यकर्त्याचा भाजपमध्ये झालेला प्रवेश हा या भागात पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये भाजपला मोठी ताकत मिळवून देणारी ठरणार आहे. काही विद्यमान नगरसेवक भाजपामध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. यांचा सुध्दा भाजपामध्ये योग्य वेळ पाहुन प्रवेश होणार आहे. अशी प्रतिक्रिया सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी यावेळी बोलताना दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!