‘ मुड्स ‘ Unpredictable ‘ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जुलै) : नात्यातील काही प्रश्न अनुत्तरित राहिले, योग्य वेळी योग्य सुसंवाद झाला नाही तर त्या नात्यातील सुंदरता आपण गमावून बसतो, वेळप्रसंगी नात्यात टोकाचा दुरावा निर्माण होतो. विसंवादातून एखाद्या व्यक्तीचे जीवन नीरस होऊ शकते. अशाच एका नाते संबंधांतील संवेदनशील विषयावर सकारात्मक भाष्य करणारा सायको थ्रीलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मुड्स – Unpredictable’ असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे.

एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज पुण्यात लॉंच करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे निर्माते संतोष अंकुश चव्हाण, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर, अभिनेता रितेश नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाची निर्मिती एस स्क्वेअर एन्टरटेनमेंट या बॅनर खाली निर्माते संतोष अंकुश चव्हाण यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र रामभाऊ बोरकर यांनी केले आहे. त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण होत असले तरी बोरकर हे मागील 20 वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक नाटक तसेच विविध मालिकांचे लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळविली आहे.

आगामी ‘मुड्स – Unpredictable’ या चित्रपटाबद्दल बोलताना लेखक, दिग्दर्शक महेंद्र रामभाऊ बोरकर म्हणाले, आयुष्याला पॉझिटिव्ह एनर्जी देणारी ही कथा आहे.हल्ली आपण फार यांत्रिक म्हणजे रोबोट सारखे जीवन जगतोय. संवेदशीलता हरवून चाललीय.कोणतेही नाते टिकण्यासाठी, फुलण्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो,नात्यात सुसंवाद नसेल तर ते नाते, रिलेशनशिप फक्त नावाला असते. एखादी घटना वाईट घडली म्हणजे संपूर्ण आयुष्यच वाईट नाही, आयुष्य अधिक सुंदर कसे करता येईल, नाते कसे फुलवता येईल हे मनोरंजक पद्धतीने सांगितलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट होय. हा चित्रपट प्रत्येकाला नात्याबद्दल नवीन विचार देईल.मुडस या सायको थ्रिलर नंतर महेन्द्र बोरकर, या तरुणाईला समर्पित बॉईज वर्सेस गर्ल्स हा नवीन चित्रपट घेऊन येणार आहेत.बॉईज वर्सेस गर्ल्स ही धमाल कॉमेडी आणि फुल मनोरंजनाची मेजवानी असेल.आपल्याला वय विसरून प्रेमात पाडणारी गोष्ट असेल.

अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, कोरोना काळानंतर आता नवनवीन चित्रपट तयार व्हावेत, निर्मात्यांनी पुढे यावे आणि चित्रपटसृष्टीचे काम पुन्हा जोमावे सुरू व्हावे अशी आमची इच्छा आहे. चित्रपट महामंडळ सर्व चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

11 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

16 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago