Google Ad
Editor Choice

तालेरा हॉस्पिटल चिंचवड येथे आग लागली सुदैवाने जीवित हानी नाही

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ मे) : पिंपरी चिंचवड मनपाच्या  तालेरा हॉस्पिटल चिंचवड येथे आग लागली सुदैवाने जीवित हानी झाली नाही तसेच आगीचे कारण समजू शकले नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील तालेरा रुग्णालयात आग लागली, ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. महानगरपालिकेच्या तालेरा हॉस्पिटलच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. हि आग इन्व्हर्टरच्या बॅटरीमध्ये लागली असून, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता.

Google Ad

सदर घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन विभाग मुख्य केंद्राचे दोन,प्राधिकरण,थेरगाव, रहाटणी उपकेंद्राचे प्रत्येकी एक असे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून काही वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!