Google Ad
Uncategorized

एक्झिट पोल आला समोर … अजितदादांनी रात्रीचा दिवस करूनही चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची परिस्थिती अवघड तर, कसब्यात धक्कादायक निकाल लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मार्च) : स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे लागलेली चिंचवड आणि कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल ०२ तारखेला लागणार आहे. यामध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष राहुल तानाजी कलाटे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. तर कसब्यात भाजपच्या हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदार संघात उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे. असे असताना आता चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल नुकताच समोर आला आहे. या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Google Ad

यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, या पोलनुसार ही जागा भाजपच जिंकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

२ तारखेला होणाऱ्या मतमोजणी वरून सर्व गोष्टी समोर येतील. याबाबत तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केलेला असला तरी एक्झिट पोलने मात्र वेगळेच चित्र दाखवले आहे. कसब्यात मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल असे म्हटले जात आहे.

चिंचवडमध्ये अश्विनी लक्ष्मण जगताप भाजप ४५% – ४७%, तसेच नाना काटे राष्ट्रवादी : ३१% – ३३% आणि राहुल कलाटे अपक्ष १८% – २०% असे मतदान होण्याची शक्यता आहे. तर, असे असताना कासब्यातील मतमोजणीपूर्वीच एक एक्झिट पोल व्हायरल झाला असून यामध्ये रवींद्र धंगेकर सरळ बाजी मारताना दिसत आहेत. यामुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे. स्ट्रेलीमा या संस्थेचा एक्झिट पोल व्हायरल झाला आहे.

तर, सध्या चिंचवड बरोबर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यात धंगेकर बाजी मारणार की रासने भाजपचा कसब्याचा गड राखणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे .आता २ तारखेला सगळं समोर येईल.

या एक्झिट पोल नंतर चिंचवड मध्ये भाजपच्या तर कसब्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. आता हा आनंद २ तारखेपर्यंत टिकणार का? आणि कोण कोठे विजयी गुलाल खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!