Google Ad
Editor Choice

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत दिला मोठा निर्णय … ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते.

यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर करण्यात आले आहे. ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे‘ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे.

Google Ad

चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत. निवडणुक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयानंतर ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर केले आहे.

या पोस्टरवर ठाकरे गटाचे शिवसेनेचे मशाल हे नवे चिन्ह दिसत आहे. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नवे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे दखील दिसत आहे. अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे गट हेच नाव आणइ हेच चिन्ह वापरणार आहे. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी देखील मशालीसह फोटो शेअर केला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!