महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑक्टोबर) : राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यामध्ये, शिवसेनेचे दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्याकडून देखील जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. या सगळ्यांना आगामी निवडणुकीत टक्कर देण्यासाठी भाजपने देखील आपली रणनीती आखली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षांनी देखील एकजूट होत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये घडणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुक पार पडणार आहे. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकांआधी आणखी एक महत्त्वाची निवडणूक पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. याबाबतची घोषणा स्वत: राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे.
संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 06 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं. पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे ते ओझरत समजण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपच्या गोटात दररोज बैठकांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांची देखील एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…