Google Ad
Editor Choice Sports

सांगवीतील आमदार चषक क्रिकेट स्पर्धेची चर्चा रंगली ‘मावळात’ … मावळ इलेव्हन संघाने कडवी झुंज देत जिंकला सामना …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी २०२२) : नुकताच २०२१ वर्ष संपन्न झाले असून २०२२ वर्षाला प्रारंभ झाला आहे. २०२०-२१ या वर्षात जगभरात कोरोनाने थैमान घातला होता. ज्यामुळे अनेक मोठ मोठ्या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. याचा आनंद पिंपरी चिंचवडकरांनी घेतल्याचे आज पहायला मिळाले, निमित्त होते सांगवीत होणारे रोमहर्षक आमदार चषक क्रिकेट सामने…

२०२२ या नववर्षात क्रिकेट रसिकांसाठी मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट प्रेमी खेळाडूंना भरपूर मेजवानी आहे. या वर्षात एकूण ९२ संघात आमदार चषक क्रिकेट स्पर्धा होत आहेत.

Google Ad

आज पाचव्या दिवशी (मंगळवार ०४ जानेवारी ) सकाळी ०९ वाजता नवी सांगवीतील PWD मैदानावर क्रिकेट समन्यांना सुरुवात झाली. आज झालेल्या सामन्यात शहराच्या अनेक भागातून तसेच मावळ तालुक्यातील संघाणीही भाग घेतल्याचे दिसून आले. ‘मावळ इलेव्हन’ आणि ‘विशाल कवडे इलेव्हन’ यांच्यात झालेल्या चुरशीच्या रोमहर्षक सामन्यात मावळ इलेव्हन ने कडवी झुंज देत सामना जिंकला.

चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त फुल पिच टेनिस बॉल आमदार चषक क्रिकेट स्पर्धाचे आयोजन माजी नगरसेवक ‘शंकरशेठ जगताप’ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील ‘पीडब्लूडी’ मैदान येथे करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच स्टंप मध्ये live कॅमेरा ची सोय उपलब्ध करण्यात आली आहे, हे या सामन्यांचे वैशिष्ट्य आहे. या आयोजनात अजय दुधभाते, निलेश जगताप तसेच मनीष कुलकर्णी यांचे योग्य नियोजन आणि मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे दिसून येत होते.

आमदार चषक क्रिकेट सामन्याचे लाईव्ह थेट प्रेक्षपण http://Www.criclife.in अजयदादा दुधभाते, दिपक मंडले सर,प्रदिप गुळमिरे सर्व टीम यांनी अगदी साजेसे असे केले आहे,त्यामुळे क्रिकेट प्रेमींनी घरात बसून खेळाचा आनंद घेतला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!