Google Ad
Editor Choice

१८ तारखेला होणाऱ्या अर्पण व पूजन सोहळ्याची आ. अण्णा बनसोडे यांच्या वतीने जय्यत तयारी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १३ जून) : येत्या १८ जून ला संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास २१ किलो चांदीचे पादुका,सिंहासन, अभिषेक पात्र आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने अर्पण करण्यात येणार आहे.त्या सोहळ्याची जय्यत तयारी  रंगीत तालीम आज हॉटेल ग्रँड एक्झॉटिका मध्ये पार पडली.जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्यामध्ये पहाटेच्या अभिषेकास लागणारे पात्र,सिंहासन, पादुका याची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढून त्याचे पूजन करून अर्पण करण्याचा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात आजची बैठक पार पडली.

१८जून सकाळी   वाजता विठ्ठल मंदिर आकुर्डी ते आमदार अण्णा बनसोडे यांचे जनसंपर्क कार्यालय येथे अर्पण साहित्याची भव्य दिंडी मिरवणूक निघणार आहे.त्यामध्ये पिंपरी चिंचवड भजनी मंडळ  वारकरी संप्रदायातील सर्व भाविक मोठया संख्येने सामील होणार आहेत.त्यानंतर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष चैतन्य महाराज देगुलकर,.. गहनीनाथ महाराज औसेकर यांच्या सह इतर नामवंत कीर्तनकार महाराजांचे मार्गदर्शन  आशीर्वाद सोहळा पार पडणार आहे.तदनंतर संत तुकाराम महाराज देवस्थान चे अध्यक्ष .. नितीन महाराज मोरे यांच्या उपस्थितीत सिंहासन,अभिषेक पात्र  पादुकांचे विधिवत पूजा करून त्याचे अर्पण करण्यात येणार आहे.हा अर्पण सोहळा पिंपरी चिंचवड शहर वासीयांना भक्ती आणि शक्ती सोहळा ठरणार असल्याचे उदगार .. शेखर महाराज कुटे यांनी केले

Google Ad

.तसेच इस्कॉन चे जगदीश गौरांग दास प्रभुजी यांनी या सोहळ्याचे कौतुक करत इस्कॉन च्या वतीने दिंडी पार पडल्यानंतर पुष्प अभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली... सतीश गव्हाणे महाराज यांनी सर्व भजनी मंडळांनी  वारकर्यांनी जोशपूर्ण वातावरणात जसे पालखी सोहळ्यात सहभागी होतो तितक्याच उत्साहात सहभागी होण्याचे आवाहन केले.आमदार अण्णा बनसोडे यांनी हा सोहळा माझा राहिला नसून तो आता संपूर्ण वारकरी संप्रदायाचा झाला आहे.मी फक्त निम्मित मात्र आहे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर वासीयांच्या वतीने हा अर्पण सोहळा पार पडेल   यापुढे देखील दरवर्षी अखंडपणे या सोहळ्याचे नियोजन करू असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.  आजच्या या बैठकीस उद्धव कोळपकर,सतीश गव्हाणे,सोपान मुळेविश्वनाथ वखारे,पांडुरंग फुगे,सुरेश काटे,माऊली भदाले,गोकुळ भुजबळ,अण्णा कापसे,विजय भोंडवे,गुलाब काटे,किशोर पाटीलमाधुरी ओक,ज्योती कानिटकर,गजराबाई काटे,गीते बाई,मा नगरसेवक प्रसाद शेट्टी,संदीप चिंचवड,निलेश शिंदे,मुकेश सोमय्या,सामाजिक कार्यकर्त्या नीता ढमाले,संजय ढमाले,सतीश लांडगे,लहू तोरणे,शशिकांत घुले,संजय औसरमल यांच्या सह पिंपरी चिंचवड मधील भजनी मंडळाचे प्रतिनिधी  वारकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!