Google Ad
Articles Technology

निसर्गातील हा चमत्कार टिपण्यासाठी तो १९ वर्ष अडून राहिला … पहा काय आहे, चमत्कार?

महाराष्ट्र 14 न्यूज : जगातला आकाराने सर्वात लहान पक्षी हा बहुमान ‘हमिंगबर्ड’ म्हणजेच ‘गुंजन’ पक्ष्याला मिळाला आहे. सकाळच्या प्रहरी याच दिसणं म्हणजे दिवस शुभ जाण्याचा संकेत असतो असं बऱ्याच ठिकाणी मानलं जातं! फक्त ३ ते ४ इंचाच्या या टीचभर आकाराच्या पक्ष्याला निसर्गाने एक वेगळंच देणं दिलं आहे आणि ते म्हणजे या हमिंगबर्डच्या पंखांतून जेव्हा सूर्यप्रकाश जातो, तेव्हा त्याचे पंख अद्भुत अशा इंद्रधनुषी सप्तरंगांनी झळाळून उठतात.

Google Ad

या दुर्मिळ आणि अद्भुत प्रसंगाचं चित्रण करण्यासाठी एका फोटोग्राफरने थोडी-थोडकी नव्हे, तर आपल्या आयुष्यातली तब्बल १९ वर्षें खर्ची घातली आहेत. त्या फोटोग्राफरचं नाव आहे ख्रिस्तीयन स्पेन्सर!!

हमिंगबर्ड जरी दिसायला लहान असला तरी तो ताशी जवळपास ५४ किलोमीटरच्या वेगाने उडू शकतो! एवढंच नाही, तर एका सेकंदात आपले पंख ८० वेळा फडफडवू शकतो. पण त्याच्या पंखातून इंद्रधनुष्यी आविष्कार टिपण्यासाठी तो सूर्याच्या समोर असणेसुद्धा आवश्यक आहे. यावरून तुम्हाला ख्रिस्तीयनची कामगिरी किती कठीण असेल याचा अंदाज येईल!

हा फोटो काढण्यासाठी हा ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर तब्बल १९ वर्षे ब्राझिललच्या इटाटिया नॅशनल पार्कमध्ये ठाण मांडून बसला होता. त्याच्या या कामगिरीने मात्र सगळ्यांचेच डोळे विस्फारले असून सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे! या फोटोग्राफीसाठी त्याला २०११ सालीच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय!! हमिंगबर्डच्या या विलोभनीय दृष्यांचा ख्रिस्तियनने एक सुंदर व्हिडिओ बनवलाय. हा व्हिडिओ “The dance of time” या नावाने तो यूट्यूबवर उपलब्ध आहे.

प्रा्प्णिजगतातून आपल्याला अशा अनेक अद्भुत आणि विस्मयकारी घटनांचं दर्शन होऊ शकतं. फक्त त्यासाठी त्यांच्याबद्दल प्रेम आणि संयम ठेवून त्यांचा अभ्यास करायला हवा!! खुद्द प्राणीजगत हाच एक चेतनेचा अद्भुत आविष्कार आहे! आणि या घटना ही दृष्ये आपल्याला जाणीव करून देतात की आपल्याला अजून बरंच काही शोधायचं आहे. अजून आपल्याला बरंच काही पाहाणं आणि अनुभवणं बाकी आहे!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!