Google Ad
Editor Choice

महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व म्हणजे यशवंतराव…… डॉ.दिलीप गरुड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ नोव्हेंबर) : यशवंतरावांची जडणघडण चौफेर वाचनातून झाली. त्यांच्या मातेने त्यांचा स्वाभिमान जागवला. म्हणून खडतर परिस्थितीतही त्यांनी स्वतःला घडवले माणसांबद्दल त्यांच्या मनात सहृदयता होती. साहित्य, संगीत, कला, प्रशासन पंचायत राज्य यांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली.

यशवंतराव हे खऱ्या अर्थाने रसिक होते. कुस्ती, तमाशा, नाटक, संगीत, साहित्य अशा सर्वच विषयात त्यांना रस होता. खऱ्या अर्थाने ते महाराष्ट्राचे शिल्पकार होते म्हणूनच यशवंतराव म्हणजे महाराष्ट्राचे सुसंस्कृत नेतृत्व होय असे मत यशवंतराव चव्हाण स्मृती दिनानिमित्त कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर सांगवी येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई व कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर सांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण स्मृती दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

Google Ad

त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विविध कार्याची माहिती व जीवनपट उलगडून सांगितला. तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक  शिवाजी माने हे सुध्दा कृष्णा काठे च्या मुशीत वाढलेले असल्याने त्यांच्यावर यशवंतरावांचा प्रभाव झालेला त्यांच्या कार्यातून दिसतो एक प्रभावी नेतृत्व पाहायला मिळते असे ते म्हणाले. यावेळी यशवंतरावांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने डॉ.न.म.जोशी लिखीत सह्याद्रीचा सुपुत्र व डॉ.दिलीप गरुड लिखीत जीवन तरंग हे पुस्तक देण्यात .

यावेळी प्रतिष्ठान चे समन्वयक मा. शंकर भिडे,मुख्याध्यापक शिवाजीराव माने, शोभा वरठी, शिक्षक हेमलता नवले, सीमा पाटील, मनिषा लाड, स्वप्नील कदम, भाऊसो दातीर, शितल शितोळे, दिपाली झणझने, तपस्या सोमवंशी, श्रध्दा जाधव, संगिता सुर्यवंशी, निता ढमाले, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, मनिषा गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजीराव माने व निवेदन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!