Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गुणवंत कामगारांचा महानगरपालिकेने वर्धापन दिनी सन्मान करावा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ ऑक्टोबर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आस्थापनेतील समाजाप्रती केलेल्या सामाजिक कार्याची  दखल घेऊन कामगारांना”गुणवंत कामगार” पुरस्काराने दरवर्षी  सन्मानित करण्यात येते. गेल्या पाच वर्षीतील म्हणजे  2015 व  2017 मधील गुणवंताचा 33 वा सन्मान सोहळा 9 फेब्रुवारीला मुंबईतील दादर येथे त्यावेळेसचे कामगार मंत्री मा.दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री बच्चु कडू ,कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे,सहाय्यक आयुक्त समाधान भोसले यांच्या उपस्थित पार पडला.

एक वर्षे संपत आले तरी पालीकेला वेळ मिळत नाही. मात्र प्रशासकीय व राजकीय कार्यक्रम ही जोरात चालू आहेत. विषेश म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी औद्योगिक नगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्राला परीचीत आहे.ज्या कामगार कष्टकऱ्यांच्या जिवावर पालिका आहे ,त्याचाच विचार विसर पडला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Google Ad

शासनाने शहरातील कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्यानंतर  पालीका आपल्या शहरातील सर्व गुणवतांचा सन्मान करण्याची परंपरा आहे, पालीकेने गुणवंताचा सन्मान करावा एवढीच माफक अपेक्षा कामगार वर्गातुन होत आहे.
यावेळी मा.उपमहापौर केशव घोळवे यांनी सांगितले की येत्या मनपाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी गुणवंताचा सन्मान घेण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा घेईल असे सांगितले.

दुसरे विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे म्हणजे पुणेजिल्हा व पिंपरी चिंचवड मधील पहिले तर महाराष्ट्रातील दुसरे गुणवंत पुरस्कार प्राप्त पहीले दापत्य होण्याचा मान आण्णा(श्रीकांत)जोगदंड व संगिता जोगदंड याना मिळाला आहे. आणि ते  शहराचे प्रथम नागरिक सौ माई ऊर्फ उषा ढोरे यांच्या सांगवीतीलच आहेत.

यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने मा. आयुक्त राजेश पाटील व मा.महापौर माई ढोरे याना भेटून ,गुणवंत कामगाराचा पालीकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा म्हणून निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,मुळशी विभाग प्रमुख मिना करंजावणे, , कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, सचिव मुरलीधर दळवी,गुणवंत कामगार सौ संगिता जोगदंड,महेश मेस्त्री,अवसरकर दत्तात्रय,सुनिल कुटे,श्रीकांत भुते, विकास कोरे ,ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!