Google Ad
Editor Choice

झोपडपट्टी भागातील दिशा भरकटलेली बालके खेळणार “ स्लम सॉकर ” ही राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : मा . श्री . कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी खेळाडुंना दिल्या शुभेच्छा …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ मार्च) : आज दिनांक २९ .०३.२०२२ रोजी नागपुर येथे होणा – या ” स्लम सॉकर ” या राज्यस्तरीय फुटबॉल  स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचेवतीने राबविण्यात येणा – या क्रिडा उपक्रमांतर्गत झोपडपट्टी भागातील मुलांची निवड झाल्याने पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी हिरवा झेंडा दाखवुन पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड येथुन सर्व खेळाडुंना स्पर्धेसाठी नागपुर येथे रवाना केले .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये घडणाऱ्या विविध गुन्ह्यातील सहभागामध्ये अल्पवयीन ( विधीसंघषित ) बालकांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते . अशा बालकांना योग्य वेळी समुपदेशन व मार्गदर्शन न केल्यास अशी बालके कायमस्वरूपी गुन्हेगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही . या अनुषंगाने मा . श्री . कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणा – या विधीसंघर्षित बालक व गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी गेली दोन वर्षे त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळावी या दृष्टिकोनातुन झोपडपट्टी भागात विशेष बाल पथक गुन्हे शाखा यांचेमार्फतीने क्रिडा उपक्रम राबविण्यात येत असून सदरचे क्रिडा प्रशिक्षण श्री . संदेश बोर्ड ( क्रिडा प्रशिक्षक ) हे देत असुन , त्यांचे मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट फुटबॉल टीम तयार झालेली आहे .

Google Ad

दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी पासून ” स्लम सॉकर ” या महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा नागपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत . या स्पर्धेकरीता पिंपरी चिंचवड • पोलीस आयुक्तालयावतीने राबविण्यात येणा – या क्रिडा उपक्रमांतर्गत हद्दीतील १० उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूंची निवड झाल्याने आज सर्व खेळाडुंना क्रिडा प्रशिक्षकासह नागपुर येथे फुटबॉल स्पर्धेसाठी पाठविण्यात आले आहे , याप्रसंगी मा . पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश यांनी सर्व खेळाडुंचे स्वागत करुन त्यांना फुटबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा देवुन कोणत्याही खेळामध्ये हार व जीत ही होतच असते तुमची या स्पर्धेसाठी निवड झाली हाच तुमच्यासाठी एक खुप मोठा विजय आहे .

खेळाडुंची ही पिढी नवीन दिशा देणारी आहे तुम्ही झोपडपट्टी भागातील दिशा भरकटलेल्या मुलांसाठी एक चांगला आदर्श बनणार आहात . आपण खेळ जिंकण्यापेक्षा तो खेळ किती प्रामाणिक होऊन खेळलो यातुनच आपल्याला समाधान मिळणार आहे असे बोलून उपस्थित सर्व खेळाडुचे मनोबल वाढवुन त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या .

सदर कार्यक्रमात मा . श्री कृष्ण प्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेसह मा . श्री . मकरंद रानडे , विशेष पोलीस महानिरीक्षक , गुन्हे अन्वेषण विभाग पुणे . श्री . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . काकासाहेब डोळे , पोलीस उप – आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड मा . श्री . डॉ . सागर कवडे , सहायक पोलीस आयुक्त , पिंपरी विभाग संदेश स्पोर्ट फाउंडेशचे श्री संदेश बोर्डे , श्री . ऋषिकेश तपसाळकर ( सामाजिक कार्यकर्ते ) तसेच गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार संपत निकम , कपिलेश इगये महिला पोलीस दिपाली शिर्के , आदी उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!