Google Ad
Editor Choice

रंगतदार स्पर्धेला पिंपळे गुरवमध्ये महिलांचा मिळाला उदंड प्रतिसाद …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील महिलांना मनोरंजनाची पर्वणी मिळावी म्हणून माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून विविध सांस्कृतिक व क्रीडा मोहस्तवाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये ‘न्यू होम मिनिस्टर, खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका उषाताई मुंढे, सुषमाताई शशिकांत कदम,कावेरीताई संजय जगताप, रविनाताई सागर अंगोळकर, पल्लवीताई महेश दादा जगताप, वैशालीताई राहुल जवळकर यांच्या वतीने दोन दिवस करण्यात आले होते.

Google Ad

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमिताने पिंपळे गुरव येथे आयोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला असल्याचे येथे झालेल्या गर्दीवरून दिसून येत होते. आपलेला दिलेला टास्क पूर्ण करणे अन् सोबतीला संगीताचा ठेका अशा उत्साहात ही स्पर्धा रंगली होती.

आर जे अक्षय आणि विजय उलपे यांनी दोन दिवसांत घेतलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात उखाणे, रिंग, चेंडू फेकणे, रस्सी खेच, लंगडी, संगीत खुर्ची, धागा वेचणे अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सोबत मानाची पैठणी अशा रंगारंग कार्यक्रमांमध्ये पिंपळे गुरव परिसरातील महिला रंगून गेल्या होत्या.

शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा होता. सोबतीला संगीताचा ठेका अन् उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. अठरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक या स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. विजेत्यांचा पैठणी तसेच फ्रिज, टीव्ही,वॉशिंग मशीन, मिक्सर,ओवन देऊन सौ अस्विनीताई जगताप व अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. खेळाचा आनंद घेत घरगुती वापराच्या उपयोगी वस्तू मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमानंतर सर्वांना रुचकर भोजनाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!