Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड मनपाच्या जनसंवाद सभेत शाम जगताप यांनी मांडल्या पिंपळे गुरव येथील समस्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि १० ऑक्टोबर): महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी जनसंवाद सभा दर सोमवारी घेण्यात येत असते. यामध्ये नागरिक तक्रारीच्या समस्या मांडत असतात.

महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात नेहमी प्रमाणे सोमवारी जनसंवाद सभा पार पडली. मुख्य समन्वय अधिकारी सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी नागरिकांशी संवाद साधला. सभेत एकूण सहा नागरिकांनी उपस्थित राहून तक्रारींच्या समस्या मांडल्या. यावेळी मुख्य समन्वय अधिकारी प्रमोद ओंबासे यांनी नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित निराकरण करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष शाम जगताप यांनी प्रथमच जनसंवाद सभेत उपस्थित राहून जुना प्रभाग क्र. २९ मधील प्रशासनाकडून होत असलेल्या संथगती व अर्धवट कामांचा पाढा छायाचित्रांच्या पुराव्यासहित वाचून दाखविला. यावेळी मुख्य समन्वय अधिकारी यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्वरित तक्रारींचे निवारण करण्याचे आदेश संबंधित अधिकारी यांना देण्यात आले.

Google Ad

पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या अर्धवट व संथगतीच्या कामाचा पाढा वाचून दाखविण्यात आला. यामध्ये कल्पतरु इस्टेट येथील पदपथाचे काम अपूर्ण अवस्थेत तसेच येथील विद्युत केबल उघडयावर पडल्या आहेत. सिग्नल जवळील दुभाजकाचे काम अर्धवट अवस्थेत. अमृता कॉलनी येथील रस्त्याची दुरवस्था होऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. साठ फुटी रोड वरील विद्युत वाहिनीचे काम अपूर्ण. गारवे लॉन्स येथील रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक, मातीचे ढिगारे, राडारोडा पडल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काशीद नगर येथील रस्त्याच्या कडेला डीपीला लागून असणारे केबल उघडयावर पडले आहेत.

कृष्णाई विहार फेज १ येथील रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर चेंबरची झाकणे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र येथील पदपथाचे काम अर्धवट अवस्थेत. भीमाशंकर येथील पदपथाचे काम संथगतीने सुरू आहे. गावठाण येथील नदीकिनारी असलेले ड्रनेज पाईपलाईन फुटल्याने नदी प्रदूषित होत आहे. मुक्तांगण लॉन्स येथील रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डीवाईन इंग्लिश मिडीयम स्कूल येथील रस्त्याची दुरावस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना ये-जा करताना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!