महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ ऑक्टोबर) : पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ठरले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार, हे चित्र आज उशिरा स्पष्ट झाले . महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या चार महत्त्वाच्या मतदारसंघांतील निवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा पिंपरी मतदारसंघातील तिढा सुटल्यानंतर आता चिंचवड आणि भोसरी मतदारसंघातीलही तिढा सुटला आहे. शहरातील तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटले आहेत.
भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अजित गव्हाणे, चिंचवडमधून राहुल कलाटे, तर पिंपरी सुलक्षणा धर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडमध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी राहुल कलाटे यांच्या तिकीटासाठी जोरदार प्रयत्न केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे या मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महायुतीने शहरातील उमेदवार जाहीर करून आठ दिवस झाले. परंतु, महाविकास आघाडीतील गोंधळ कायम होता. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही महाविकास आघाडीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली होती.
भोसरीत उद्धव गटाचे इच्छुक उमेदवार रवी लांडगे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही समर्थकांनी सोशल मीडियावर “फिक्स आमदार” व “भावी आमदार” अशा पोस्ट केल्या होत्या, परंतु आजच्या यादीत रवी लांडगे यांचे नाव वगळण्यात आले. उमेदवारी न मिळाल्यामुळे भोसरीत आता लांडगे बंड करतील का, यावर चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला साथ देतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
तर चिंचवडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी तिन्ही इच्छुक नेत्यांनीशरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत तिघांना एकमत करण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या होत्या. त्यामुळं या तिघांचं एकमत झालं नाही तर पवार स्वतः एकाच्या नावाची घोषणा करणार होते. त्यानंतर आज चिंचवडमधून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर आता नाना काटेंच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. त्यानंतर आता नाना काटे बंडखोरी करण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…