Google Ad
Editor Choice

पिं.चिं. मनपाच्या ३१ मे च्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष … महिलांच्या ७० चिठ्ठ्या काढण्याची, अशी होणार प्रक्रिया

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०मे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी २०२२ च्या निवडणुकीसाठी १३९ जागेसाठी निवडणूक होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अनुसूचित जाती ( एससी ) , अनुसूचित जमाती ( एसटी ) व सर्वसाधारण खुला गटातील ( ओपन ) जागेसाठी महिला आरक्षण सोडत मंगळवारी ( दि . ३१ ) सकाळी अकराला चिंचवडच्या प्रा . रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात काढली जाणार आहे .

या सोडतीची संपूर्ण तयारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने पूर्ण केली आहे . त्यासंदर्भात सरावही घेण्यात आला आहे . अंतिम त्रिसदस्यीय ४६ प्रभाग प्रभागरचना १३ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली . आता आरक्षण सोडत मंगळवारी ३१ मे रोजी काढली जाणार आहे . पारदर्शक काचेच्या ड्रममध्ये एका रंगाच्या चिठ्ठया टाकून विद्यार्थ्यांच्या हस्ते ही चिठ्ठी काढली जाणार आहे . नागरिकांना सोडत व्यवस्थित दिसावी म्हणून प्रेक्षागृहात व बाहेर स्क्रिन लावण्यात येणार आहे .

Google Ad

संपूर्ण सोडतीचे छायाचित्रिकरण केले जाणार आहे . गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्तासह पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे , असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले . सोडतीसंदर्भात इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता आहे . सोडतीनंतर १ ते ६ जून असे सहा दिवस सोडतीसंदर्भात हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत . हरकती व सुचनांचा विचार करून १३ जूनला प्रभागनिहाय आरक्षण अंतिम करून ते प्रसिद्ध केले जाईल .

▶️अशी होणार प्रक्रिया :
प्रथम एससीच्या एकूण २२ जागांपैकी महिलांसाठी ११ जागांची सोडत काढली जाणार आहे . त्यानंतर एसटीच्या एकूण ३ जागांपैकी महिलांच्या २ जागांची सोडत निघेल . एससी व एसटीच्या एकूण २५ जागांच्या चिठ्ठया बाजूला ठेवल्या जातील . उर्वरित ११४ जागांतून सर्वसाधारण खुल्या गटातील महिलांच्या ५७ जागांची चिठ्ठी काढली जाईल . त्यासाठी प्रथम प्रभागातील ‘ अ ‘ जागेवरील चिठ्ठया काढल्या जातील . त्यानंतर ‘ ब ‘ जागेवरील चिठ्ठया निघतील . उर्वरित राहिलेल्या जागा या सर्वसाधारण खुला गटासाठी असतील . एका प्रभागात जास्तीत जास्त दोन महिलांच्या जागा आरक्षित असणार आहेत . एक प्रभागात सर्वच्या सर्व तीन महिलांचे आरक्षण असणार नाही . महिलांच्या ७० चिट्ट्या काढणार एससीच्या २२ पैकी ११ जागा महिलांचा आहेत . तर , एसटीच्या ३ पैकी २ जागा महिलांसाठी आहेत . सर्वसाधारण खुल्या गटासाठी एकूण ११४ जागा असून , त्यातील ५७ जागा महिलांकरीता आहेत . एकूण १३ ९ जागेतून महिला जागेसाठी ७० चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत . महिला आरक्षणाच्या सोडतीनंतर निवडणूक कोण लढू शकतो? लढती कशा होऊ शकतील याचा अंदाज बांधता येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!