पिं. चिं. मनपाच्या वतीने ” मिशन नियमित लसीकरण मोहिम ” … शून्य ते २ वर्ष वयोगटामधील लहान मुलांचे आणि सर्व गर्भवती महिलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३० मे २०२१) : क्षयरोग, पोलिओ, गोवर-रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिल्स इन्फ्लुएंझा टाईप बी अशा आजारांसाठी बालकांचे लसीकरण केल्याने बालकांना सुरक्षित करता येते. त्यामुळे बालकांचे नियमित लसीकरण करणे आवश्यक असून महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्षेत्रात ” मिशन नियमित लसीकरण मोहिम” राबवत आहे. यामध्ये शून्य ते २ वर्ष वयोगटामधील लहान मुलांचे आणि सर्व गर्भवती महिलांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

सद्यस्थितीत बालकांमधील आजारपण व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे अत्यंत उपयुक्त प्रभावी माध्यम आहे. क्षयरोग, पोलिओ, गोवर-रुबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिल्स इन्फ्लुएंझा टाईप बी अशा आजारांसाठी बालकांचे लसीकरण केल्याने बालकांना सुरक्षित करता येते. केंद्र शासनाने पूर्ण लसीकरण किमान ९० टक्के करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. नियमित लसीकरणापासून जे बालक सुटलेले/वंचित आहेत, ज्यांनी लसीकरण मधूनच सोडून दिलले आहे अथवा लसीकरणास नकार दिलेला आहे अशा सर्व बालकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटे मध्ये लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. कोविड-१९ आजाराच्या मोठया प्रमाणावरील प्रादुर्भावामुळे सन २०२१ मध्ये नियमित लसीकरणाचे काम कमी झालेले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘’मिशन नियमित लसीकरण मोहिम, पिं.चिं.म.न.पा.’’ राबविली जात आहे. यासाठी महानगरपालिकेने ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित केले आहे.

यामध्ये शून्य ते २ वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी व गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणा-या सर्व लसीव्दारे लसीकरण करणे, “०” (झिरो डोस) पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करणे, कोरोना आजाराच्या काळात लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या बालकांचे लसीकरण, तसेच लसीकरणास नकार देणा-या कुटुंबातील व समाजातील बालकांचे लसीकरण करणे, महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण लसीकरणाचे काम जलदगतीने वाढविणे, संपूर्ण लसीकरण (Complete immunization coverage) करणे (MR-2 व इतर बूस्टर डोसेस), Vaccine Preventable Diseases चा उद्रेक कमी करणे आदींचा समावेश आहे.

दि.०१ जून ते ०७ जून २०२१ दरम्यान ए.एन.एम/आशा/अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थ्यांचा Head Count Survey करणे, दि.०९ जून ते २२ जून २०२१- लाभार्थी यादी तयार करणे व संख्या निश्चित करणे, अशाप्रकारे विशेष मिशन नियमित लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेमध्ये नियमित संभाव्य सत्रा व्यतिरिक्त अतिरिक्त सत्रे आयोजित करण्यात येतील. स्थायी दवाखाना/रुग्णालय, बाहयसंपर्क- अंगणवाडी इ., फिरती सत्रे- पाले, बांधकामे इ. ठिकाणांचा समावेश आहे. सर्व सत्राच्या ठिकाणी कोविड-१९ रोगप्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

लसीकरण सत्राच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था/सॅनिटायझर उपलब्ध असले पाहिजे. सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. लसीरकण सत्राच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. या मोहिमेचे कृती नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेकरीता महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण सर्व्हेक्षण (Head Count Survey) केला जाईल. (Annexure 2 to 5) च्या आधारावर लसीकरणापासून वंचित राहिलेले व गळती झालेले लाभार्थी यांचा शोध घेतला जाईल.

मिशन नियमित लसीकरण हे सर्व जोखिमग्रस्त क्षेत्रांमध्ये राबविले जाईल. जोखिमग्रस्त क्षेत्र निवडण्यासाठी पुढील निकष वापरले जातील. अतिजोखमिचे क्षेत्र आणि अतिजोखिमग्रस्त लाभार्थी (पल्स पोलिओ नुसार) स्थलांतरीत होणा-या झोपडपट्टया, बांधकाम ठिकाणे, तात्पुरर्ती पाले, वीटभट्टया, कोरोना आजार काळात झालेले स्थलांतरीत, कोरोना काळात लॉकडाऊन झाल्याने नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, शहराला लागून असणारी लोकसंख्या (पेरीअर्बन), नवजात बालके, मागिल ०३ वर्षात गोवर व इतर लसीकरणाने टाळता येणारे आजारांचे उद्रेक झालेली ठिकाणे, उपेक्षित लोकसंख्या व लसीकरणाची भिती असणारे समाज/ठिकाणे आदींचा समावेश आहे. मध्यमस्तर क्षेत्रामध्ये मध्यम स्तर झोपडपट्टी सदृश चाळी तर उच्चस्तर क्षेत्रामध्ये हाऊसिंग सोसायट्यांचा समावेश आहे.

सर्व स्तरावरीमधील HCS करताना कोविड-१९ रोगप्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत असलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असेल. जोखीमग्रस्त क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. लाभार्थी संख्येनुसार रुग्णालय झोन निहाय लसीकरण सत्रांचे नियोजन व आयोजन करण्यात येईल. वैद्यकिय मुख्य कार्यालय स्तरावरुन मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात येईल. सुक्ष्मकृती नियोजन व अंमलबजावणी करताना सर्वेक्षण यादीनुसार जोखिमग्रस्त भागांची निवड केली जाईल व तेथे मिशन नियमित लसीकरण अंतर्गत अतिरिक्त सत्रांचे आयोजन केले जाईल.

किमान २५ व त्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांकरिता ०१ सत्र आयोजित करणे, संस्थामधील सत्राचे नियमित वेळापत्रक तयार करण्यात येईल. बाहयसंपर्क सत्रात अंगणवाडी केंद्र, शाळा, घर व इतर ठिकाणी तर मोबाईल सत्राम्येटविखुरलेल्या लोकसंख्येकरिता जसे की- बांधकाम साईट, तात्पुरर्ती पाले, विटभट्टी, वस्त्या आदींचा समावेश आहे. लसीकरण चमूमधील (लसीकरण टीम) सदस्यांमध्ये एक वैद्यकिय अधिकारी, दोन ए.एन.एम., दोन आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा समावेश असेल. लसीकरण सत्राची वेळ सकाळी ०९ ते दुपारी ०४ वाजेपर्यंत असेल. ए.एन.एम., आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका/मदतनीस यांचे कार्यशाळा/प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेचा साप्ताहिक आढावा घेण्यात येईल.
प्रत्येक रूग्णालय झोन करिता एक नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल. ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी रुग्णालय यांचे स्तरावर नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत असणा-या त्रुटींचा आढावा घेण्यात येईल. सर्व शहरी क्षेत्रामधील लोकसंख्येची आणि लाभार्थ्यांची सर्व्हेक्षणव्दारा माहिती काढण्यात येणार आहे. सर्व अतिजोखिमग्रस्त भागांचा शोध घेऊन सुक्ष्मकृती नियोजन आराखडयात समावेश करण्यात येईल. शहरी क्षेत्रांतर्गत असणा-या स्वयंसेवी संस्थाशी (SHGs/CSOS/NSS/NYK/Urban NGOs etc) संपर्क करुन त्यांचा विशेष मिशन नियमीत लसीकरण पिं.चिं.म.न.पा मध्ये सहभाग घेण्यात येईल. शहरी भागातील उच्चस्तर लोकसंख्येकरीता गृहनिर्माण सोसायट्यामध्ये फिरती लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येतील.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

5 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

12 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago