Google Ad
Editor Choice

मनसेचे विविध प्रश्नांवरुन महापालिकते केलेलं आंदोलन भोवलं … गुन्हा दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९मे) : पुणे मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि नेते वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पुणे महानगर पालिकेत केलेलं आंदोलन दोघांना भोवले आहे.

१७ मार्च रोजी महापालिकेत पाण्यावरून आंदोलन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना हजर राहण्याचे आदेश काढले आहेत.

Google Ad

दोघेही पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार असल्याची माहिती मिळत आहे. वसंत मोरे आणि साईनाथ बाबर दोघेही विविध प्रश्नांवरुन महापालिकते आंदोलन करत असतात. महापालिकेची मुख्य संभेमध्ये त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे दोनच मनसेचे नगरसेवक पुणे महापाकिते आहेत, परंतु ते आपल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

वसंत मोरेंना नुकतंच शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. वसंत मोरेंना हटवून अध्यक्ष पदाची माळ साईनाथ बाबर यांच्या गळ्यात टाकण्यात आली आहे. वसंत मोरेंना एक डॅशिंग नगरसेवक म्हणून देखील ओळखले जाते. आता वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांना शिवाजीनगर पोलीस अटक करतात का हे पाहावं लागणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!