Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे आदिवासी समाजाचा 12 वा वधुवर मेळावा संपन्न … 38 उपवर विवाहेच्छुक मुली आणि 27 मुलांनी केली नोंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ डिसेंबर) : आदिवासी समाजाचा 12 वा वधुवर मेळावा संपन्न पिंपळे गुरव येथे सह्याद्री आदिवासी विकास प्रबोधन संस्थेच्या सुरेखाताई सभागृहात आदिम वधू वर संस्थेचा 12 वा मेळावा संपन्न झाला, मेळाव्यात 38 उपवर विवाहेच्छुक मुली आणि 27 मुलांनी नोंद केली.

मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अशा स्वरूपाच्या मेळाव्याची गरज विशद करीत नेटके आयोजन आणि समाजाचा भरभरून प्रतिसाद याचे कौतुक केले.

Google Ad

आदिम वधू वर संस्थापक, तथा अनु. ज. सेल राष्ट्र वादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विष्णू शेळके यांनी आपल्या मनोगतात सदर मेळावे आदिवासी अस्मिता आणि अस्तित्वाच्या लढ्यातील एक छोटेसे योगदान असुन यामधून आंतर जमातीय विवाह म्हाजेच जमातीय ऐक्य साधने हा प्रमूख उद्देश असल्याचे म्हटले.

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी पिंपळे गुरव आणि शहरातील आदिवासी बांधवांच्या गुण वैशिष्ट्यांचे वर्णन करीत आदिवासी समाजाचा एकोपा आणि निवडणुकीतील निर्णायक भूमिका किती महत्वाची असते हे मांडत मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. संस्थेने यापूर्वी शहरात आठ आणि ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर याठिकाणी आदिवासी वधुवर मेळाव्याचे आयोजन केले होते.

कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेविका चंदा ताई लोखंडे, सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष कृष्णा जी भालचिम, गोंडवाना समाज मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय जी आत्राम, बिरसा क्रांति दलाचे जिल्हाध्यक्ष दिलिप आंबवणे, नवनिर्वाचित सरपंच सोमा दाते, मुख्य निबंधक सुदाम चपटे,ज्येष्ट मार्गदर्शक धावजी साबळे, अनु. ज सेलमहिला अध्यक्षा सुशिलाताई जोशी शहर सरचिटणीस देविदास आढळ, कार्याध्यक्ष राजेंद्र रेंगडे, ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष दिलीप लोखंडे शितल मडके, पार्वती जोशी आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी नेटके सूत्रसंचालन कांचन तळपे, आणि जयमाला मराडे यांनी केले छायाचित्रण श्रेया वरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात यूवा कार्यकर्ते गिरीश गवारी, राहुल बुरूड, गणेश कोकाटे, तुषार गायकवाड, सुमित चोपडे, अजिंक्य गायकवाड, निलेश गारे यांचा मोलाचा वाटा होता, आभार महिला सरचिटणीस सुनिता ताई कोळप यांनी मानले.I

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!